Office Yoga esakal
आरोग्य

Office Yoga: एकाच जागी बसून काम करताना थकवा आळस जाणंवतो? एका झटक्यात कंटाळा होईल दूर

काम करण्याची इच्छा होत नाही आणि कार्यक्षमताही कमी होते.

सकाळ डिजिटल टीम

Office Yoga : बऱ्याचदा तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने पाठ, कंबर मान, खांदे यावर ताण जाणवतो. तर कधी एकाच जागी बसून राहिल्याने उगाच थकवा, कंटाळा आणि आळसही जाणवतो. असं झालं की, कामाचा वेग कमी होतो. काम करण्याची इच्छा होत नाही आणि कार्यक्षमताही कमी होते.

पण हे काही व्यायाम आहेत, ज्यामुळे झटक्यात आळस दूर होईल आणि पुन्हा उत्साहाने तुम्ही कामाला लागाल. जाणून घेऊया.

असे करावे आसन

  • खुर्चीत थोडे पुढे सरकून बसावे. (हा स्ट्रेच उभे राहूनही करता येतो)

  • एक हात वर घेऊन कोपरात वाकवावा.

  • दंड कानाला टेकलेला असावा.

  • दुसरा हात बाजूने खालच्या दिशेने वर घेऊन दोन्ही हातांचे बोटे एकमेकांत गुंफावी. साधारण ३० सेकंद स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.

  • एका बाजूने झाल्यावर दुसऱ्या बाजूनेही करावे.

आसनाचे फायदे

  • हा स्ट्रेच केल्यामुळे आळस निघून जातो.

  • खांदे, पाठीचा वरचा भाग मोकळा होतो.

  • शिरा व स्नायूंना ताण बसल्याने त्यांची कार्यक्षमता आणि लवचिकता वाढते व सशक्त होतात. त्याची दुखणी कमी होतात.

  • दंडाची अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होऊ शकते. पोश्चर नीट होण्यासही उपयुक्त.

  • छातीच्या भागालाही ताण बसतो. त्यामुळे त्या भागातील अवयवांची कार्यक्षमता सुधारते.

  • श्वासाच्या त्रासावर सुद्धा उपयोगी. मनावरील दडपण कमी करण्यासही मदत होते.

  • फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर योगारोपाच्या मदतीने हळूहळू

  • करावे.

  • कोठेही खूप ताण देऊन किंवा झटका देऊन करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT