Office Yoga esakal
आरोग्य

Office Yoga : सुटलेलं पोट कमी करायचंय? हे आसन कमी काळातच दाखवेल परीणाम

पोट सुटणे, कंबरेचा भाग वाढणे या समस्या बहुतेकांना सतावतात. अशावेळी खूप सारं वर्कआऊट करायलाही वेळ नसतो.

सकाळ डिजिटल टीम

मनाली देव

Office Yoga Utthit Padhastasan For Reduce Belly Fat : बऱ्याचदा रोजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाला दुय्यम स्थान दिलं जातं. तासन् तास एकाच जागी बसून काम करणे. सतत तणावात वावरणे, मग काही तरी चमचमीत, तेलकट खाऊन ताण कमी करण्याचा प्रयत्न करणे यामुळे सहाजिकच आरोग्यावर आणि पर्यायाने शरीयष्टीवर त्याचा परीणाम होतो. पोट सुटणे, कंबरेचा भाग वाढणे या समस्या बहुतेकांना सतावतात. अशावेळी खूप सारं वर्कआऊट करायलाही वेळ नसतो. अशा वेळी हे एक आसन तुम्हाला नक्कीच फरक जाणवून देऊ शकेल.

उत्थित पादहस्तासन

हे बैठक स्थितीमधील तोलात्मक आसन आहे.

उत्थित म्हणजे उचलणे. पाद म्हणजे पाय आणि हस्त म्हणजे हात.

असे करावे आसन

  • प्रथम दोन्ही पाय सरळ करून बसावे.

  • आसनस्थिती करण्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पोटाच्या दिशेला घ्यावेत.

  • त्यानंतर दोन्ही हातांनी पायाच्या टाचा पकडाव्यात.

  • टाचा व्यवस्थित पकडल्यावर हळूहळू दोन्ही पाय वरच्या दिशेला ताठ करण्याचा प्रयत्न करावा.

  • सावकाश तोल सांभाळत पाय वर ताठ केले की दोन्ही पाय व पोट किंवा शरीराची पुढची बाजू एकमेकांकडे घेऊन कपाळ पायाला व पोट मांडीला टेकवावे.

  • पाठ जास्तीत जास्त ताठ असावी. श्वसन संथ सुरू असावे. शक्य तेवढा वेळ आसनस्थितीत स्थिर राहावे. आसन सावकाश सोडावे.

  • हे आसन उत्तम जमण्यासाठी पश्चिमोत्तासन व नौकासनाचा सराव करावा.

आसनाचे फायदे

  • एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त.

  • मन शांत होण्यास मदत होते.

  • पोटावर दाब आल्याने पचनक्रिया सुधारते. पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते.

  • पाठीचा कणा, पायाचे स्नायू, शिरा यांना ताण बसल्याने त्यांची कार्यक्षमता, लवचिकता वाढते.

  • हे आसन शालेय योगासन स्पर्धेच्या अभ्यासक्रमात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई सुरक्षेत चौथ्‍या स्‍थानावर! ‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोणत्या शहरात?

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Kolhapur Tragedy : क्लासमध्ये ओळख, मैत्रिणीला कोल्हापुरातून उचललं; पंढरपुरात ४ दिवस कोंडलं, कोकणात नेलं पण तिथून पळून गेली अन्...

"त्यांची मी नक्कल केली पण त्यांनी..." संध्या यांच्या आठवणीत प्रिया यांची भावूक पोस्ट; "त्यांची पुन्हा भेट..'

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

SCROLL FOR NEXT