Oppositional Defiant Disorder type of mental behavior disorder in Children 
आरोग्य

‘अपोजिशनल डेफिएंट डिसऑर्डर’ म्हणजे काय?

हा मानसिक विकार आहे

काजल गणवीर

नागपूर : शेजारच्या चिंटूचा स्वभाव फारच चिडचिडा आहे. छोट्या गोष्टीवरूनही भडकतो. काल तर त्याने हद्दच केली. चिप्सचे पॅकेट वरच्या भागाने का फाडले? तो खालून का फाडला नाही? अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आता मला दुसरा पॅकेट द्या अन्यथा मी पॅकेटमधील सर्व चिप्स फेकून देईल; पुढे कुणाला चिप्स खाऊ देणार नाही,अशा शब्दात सुनीता काकूंवर भडकला. लहान-मोठ्यांचा विचार न करता उलटून बोलण्याच्या सवयीने तो सर्वांचा नावडता झाला. चिंटूला काय बरे झाले असेल? मुलांच्या अशा वागण्याला ‘अपोजिशनल डेफिएंट डिसऑर्डर’ (ओडीडी) असे म्हणतात. हा मानसिक विकार आहे. हा विकार काय आहे हे आज जाणून घेऊया.

अपोजिशनल डेफिएंट डिसऑर्डर काय आहे?

  • हा मुलांच्या वर्तवणुकीशी संबंधित मानसिक विकार आहे.

  • या विकाराने पीडित मुलं नेहमी नकारात्मक बोलतात.

  • कोणतीही आज्ञा पाळण्यास तयार होत नाहीत.

  • केवळ विरोध करण्याचा त्यांचा स्वभाव असतो.

  • आठव्या वर्षापासून ओडीडीची लागण होऊ शकते.

  • मुलांमध्ये ६ महिन्यांपर्यंत ही लक्षणे दिसली तर त्याला ओडीडीची लागण झाल्याचे समजावे.

विकाराची लक्षणे

  • एखाद्या गोष्टीवर त्वरित राग प्रकट करणे.

  • लहान मोठ्या गोष्टींसाठी वरिष्ठांशी वाद घालणे.

  • जे सांगितले त्याच्या अगदी उलट काम करणे.

  • इतरांना राग येईल, असे वागणे.

  • स्वतः चूक करून त्याचा दोष इतरांना देणे.

  • विरोध केला तर रागात येऊन वस्तू फेकणे, तोडणे आणि नासधूस करणे.

  • नेहमी मनासारखेच व्हायला हवे त्यासाठी जिद्द करणे.

ओडीडी होण्यामागची कारणे

  • कुटुंबातील एखाद्याचा स्वभाव दबाव टाकणारा असल्यास मुलांना हा विकार जडू शकतो.

  • मुलांना न समजवता त्यांनी केलेल्या चुकांबाबत दम भरणे अथवा मारहाण करणे.

  • लहान असताना त्याची जिद्द पुरवणे आणि अचानक बंद करणे.

ओडीडीमुळे होणारा त्रास

  • मित्र बनवण्यास अडचण.

  • रागीट स्वभावामुळे एकटे राहण्याची वेळ.

  • बदला घेण्याची प्रवृत्ती वाढते.

  • शाळेतील उपक्रमांमध्ये मागे राहणे.

  • मानसिक संतुलन बिघडणे.

  • भविष्यात आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते.

  • मुलं नैराश्य आणि चिंतेच्या आहारी जाऊ शकतात.

ओडीडीवर उपाय

  • ओडीडीवर औषधोपचार शक्य नाही.

  • लक्षणे जाणवल्यास त्वरित मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क करावा.

  • मुलांसोबत संयम ठेऊन संवाद वाढवावा.

  • असा स्वभाव योग्य नसल्याचे पटवून द्यावे.

  • सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहित करावे.

  • मुलांवर दबाव टाकणे बंद करावे.

सामान्यतः चार ते आठ टक्के मुलं हे ओडीडीने पीडित असतात. यावर वेळेवर औषधोपचार करणे अत्यावश्यक आहे. या विकाराची लक्षण जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्यवेळी उपचार केल्यास मुलं बरे होऊ शकतात.

- डॉ. आशिष कुथे, मानसोपचार तज्ज्ञ, प्रादेशिक मानसिक रुग्णालय नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT