Febrile Seizure Symptoms Sakal
आरोग्य

Febrile Seizure Symptoms 'फिट्स'ची समस्या लहान मुलांमध्येही, पालकांनो याकडे दुर्लक्ष करू नका

शरीरात ताप वाढल्यावर अचानक फिट येऊ (Febrile Seizure Symptoms) शकते. लहान मुलांवर या झटक्यांचा सर्वाधिक परिणाम होतो.

सकाळ डिजिटल टीम

Febrile Seizure Symptoms In Marathi : 'फिट्स'ची समस्या केवळ प्रौढांमध्येच नव्हे तर लहान मुलांमध्येही दिसून येते. यापूर्वी मेंदूविकारांची कोणतीही लक्षणे न दिसलेल्या व्यक्तींनाही शरीरात ताप वाढल्यावर अचानक फिट येऊ (फेब्रिल सिझर्स) शकते.

लहान मुलांवर या झटक्यांचा सर्वाधिक परिणाम होतो. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अशा प्रकारचे फेफरे बहुसंख्यवेळा संसर्गामुळे उद्भवतात, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. 

पालकांनी वेळेवर लक्ष देण्याची आवश्यकता

बालरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश काथवटे यांनी सांगितले की, "कानाचा संसर्ग, सर्दी, टॉन्सिलिटिस आणि फ्लूमुळे देखील फिट्स येऊ शकतात. मुलाच्या शरीराच्या दोन्ही बाजूंचे स्नायू एकाच वेळी अचानक आकुंचन पावणे, मुलांचे रडणे, सरळ उभे राहिल्यास शारीरिस समतोल राखता न येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

उलट्या होणे आणि जीभ चावणे, संवेदनशीलता नष्ट होणे, शारीरिक समन्वय राखता न येणे अशी लक्षणे आढळतात."

फेब्रिल सिझर्समुळे मेंदूला इजा होत नाही किंवा बौद्धिक अपंगत्व येत नाही. याव्यतिरिक्त ते अधिक गंभीर विकाराचा संकेत देत नाहीत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की तापामुळे येणाऱ्या फिट्सला अपस्मार समजू नका. पालकांनी या दृष्टीने त्यांच्या मुलांच्या बाबतीत वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

बालरोग तज्ज्ञ डॉ. इरफान पल्ला म्हणाले की, "तापामुळे डोळे वर फिरणे किंवा शरीर थरथरणे अशी लक्षणे दिसून येतात. तापामुळे येणारी फिटही काही सेकंद ते १० मिनिटांत दूर होते. मुल काही मिनिटांत मूळ स्थितीत परत येते. फेब्रिल सिझर्स हे सौम्य आणि गंभीर यात विभागले जाते. सौम्य तापाचे झटके सर्वात प्रचलित प्रकार आहे आणि सहसा काही सेकंद ते १५ मिनिटांत कालावधीपर्यंत आढळून येतात."

अशा परिस्थितीत काय करावे?

  • फिट्स आल्यानंतर मुलांचे शरीर हलवू नका

  • त्यांच्या हालचाली थांबवण्याचा प्रयत्न करू नका

  • फर्निचर किंवा तीक्ष्ण वस्तूंपासून मुलांना दूर करा 

  • अंगावरील कपडे सैल करा

  • गळ्याभोवती हवा मोकळी राहील, याची काळजी घ्या

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

SCROLL FOR NEXT