पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. पिंपळाच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म लपलेले आहेत. या झाडाचे पानांपासून ते मुळांपर्यंत सर्व भाग फायदेशीर आहेत. पिंपळाचे झाड हे जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे झाड आहे.
त्यात प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि मँगनीज यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. आयुर्वेदानुसार पिंपळाच्या झाडाने अनेक आजारांवर उपचार करता येतात. या झाडामध्ये असलेले गुणधर्म श्वास, दात, सर्दी, खाज आणि नाकातून रक्त येणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत.
बऱ्याच जणांना श्वास घेण्यास त्रास होतो. यासाठी पिंपळाचे झाड फायदेशीर आहे. फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी पिंपळाच्या सालीची पावडर वापरली जाते. पिंपळाची साल वाळवून त्याची पावडर तयार करून त्याचे सेवन केल्यास श्वसनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
पिंपळाचे झाड दातांसाठी फायदेशीर आहे. पिंपळाची ताजी वेल घेऊन रोज तुम्ही त्याने दात घासले तर दात मजबूत होतात. दातदुखी कमी होते, हिरड्यांची सूज, तोंडातून येणारी दुर्गंधीही निघून जाते.
पिंपळामध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. पिपळाच्या पानांचा रस प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. या गोष्टींचे सेवन केल्याने खाज येण्याची समस्या दूर होते.
पिंपळाच्या पानामुळे जखम भरण्यासही मदत होते. पिंपळाचे पान गरम करून कोणत्याही जखमेवर लावा. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल आणि जखम लवकर भरण्यास मदत होईल.
पिंपळाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे तणाव दूर करण्यास मदत करतात. जर तुम्हाला तणावाची समस्या असेल तर तुम्ही पिंपळाच्या पानांचा रस बनवूनही पिऊ शकता.
आजकालची खराब लाईफस्टाईल आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक समस्या वाढत आहेत. त्यातच महत्त्वाची समस्या म्हणजे हृदयरोग. तुम्ही पिंपळाची 15-20 पानं घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी थंड करून गाळून घ्या. हा काढा तुम्ही दर तीन तासाने दिवसभर प्या. असं केल्याने हार्टअटॅक येण्याचा धोका कमी होतो.