People need counseling for mental disorders health doctor sakal sobat boluya helpline Sakal
आरोग्य

Health News : मानसिक विकारांबाबत लोकांना हवे समुपदेशन

‘सकाळ सोबत बोलूया’ मोफत हेल्पलाइन; राज्यातील १६ हजार जणांचा मुक्त संवाद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘सकाळ सोबत बोलूया’ ही २४ तास मोफत हेल्पलाइन उपक्रम अडीच वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत राज्यभरातून १६ हजार लोकांनी हेल्पलाइनवर मुक्त संवाद साधला आहे. यावर येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने काळजी, चिडचिडेपणा, मानसिक विकारांमुळे येणारा ताण व चिंता यामुळे येणाऱ्या नैराश्यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण ४९.७ टक्के होते.

या हेल्पलाइनवर फोन करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण ६२.१ टक्के तर महिलांचे प्रमाण ३७.४ टक्के होते. हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सच्या समस्यांमध्ये प्रामुख्याने काळजी, चिडचिडेपणा, मानसिक विकारांमुळे येणारा ताण व चिंता यामुळे येणारे नैराश्य यासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण ४९.७ टक्के होते.

नातेसंबंधातील ताण-तणाव, वैवाहिक सहजीवनामधील समस्या, एकतर्फी प्रेमामुळे येणाऱ्या नैराश्याचे प्रमाण १९.३ टक्के होते. नोकरी व व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे आलेले नैराश्य, आनुवंशिक आजार, मानसिक आरोग्याच्या समस्या व कोरोनामुळे आलेल्या नैराश्यायासंदर्भातील कॉल्सचे प्रमाण त्याखालोखाल होते.

२४ तास मोफत समुपदेशन

‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या वतीने we are in this together या मोहिमेंतंर्गत आणि कर्वे समाज सेवा संस्थेच्या सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड डीसॲबीलीटीजच्या सहकार्याने ताणतणाव, मानसिक स्वास्थ्य व समस्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘सकाळ सोबत बोलूया’ हा हेल्पलाइन उपक्रम सुरु आहे.

यात तज्ज्ञ समुपदेशक, मानसिक विकारतज्ज्ञ, मानसशास्त्रतज्ज्ञांची टीम हेल्पलाइनवर फोन करणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधार देत, त्यांचे २४ तास मोफत योग्य समुपदेशन करत आहेत.

ऑनलाइन अपॉइंटमेंट

काही लोकांना सातत्याने समुपदेशन व मार्गदर्शन सेशन्सची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन, मानसिक ताणतणाव व नैराश्यामुळे उद्‍भवणाऱ्या मानसिक समस्यांवर नाममात्र सशुल्क दरात तज्ज्ञ समुपदेशकांचे मार्गदर्शन घेण्याकरिता

we are in this together या वेबसाईटद्वारे ऑनलाइन अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. वेबसाईटद्वारे आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार तज्ज्ञ समुपदेशकांची अपॉइंटमेंट नागरिकांना बुक करता येईल.

वयोगटानुसार वर्गीकरण

  • १८ ते २९ वयोगट ८.१

  • ३० ते ४९ वयोगट २१.४

  • ५० ते ६९ वयोगट ४९.४

  • ७० पेक्षा अधिक वयोगट २१.१

ठिकाणांनुसार कॉल्स

  • ग्रामीण भाग ४.९

  • शहरी भाग ४८.६

  • निमशहरी भाग ४६.५

शिक्षणानुसार कॉल्स

  • प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झालेले ८.६

  • डिप्लोमाधारक १३.४

  • उच्च शिक्षित १४.९

  • पदव्युत्तर पदवीधारक २०.५

  • पदवीधारक ४२.६

व्यवसायानुसार वर्गीकरण (प्रमाण टक्क्यांत)

  • बेरोजगार, सेवानिवृत्त, शेतकरी, कामगार १८.९

  • गृहिणी १०.१

  • व्यावसायिक ११.१

  • विद्यार्थी वर्गांचे ११.७

  • इतर क्षेत्रातील नोकरदार १६.३

  • खासगी नोकरदार ३१.९

असा साधा संवाद

‘सकाळ सोबत बोलूया’ ०२०- ७११७१६६९ या क्रमांकावर फोन करून आपणही आमच्याशी मनमोकळेपणाने बोला. आपली व्यक्तिगत माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT