Menstrual Hygiene esakal
आरोग्य

Menstrual Hygiene : फ्लो कमी असो किंवा जास्त वेळेत बदला पॅड, वाचा एक्सपर्ट्स हायजिन टीप्स

जर तुम्ही स्वच्छता राखली नाही तर तुम्हाला इतर काही समस्या देखील येऊ शकतात

सकाळ ऑनलाईन टीम

Menstrual hygiene : मासिक पाळीत प्रत्येक स्त्रीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बर्‍याच स्त्रिया मोठ्या मूड स्विंग्ज आणि क्रॅम्पमधून जातात, तर इतर महिलांना अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. अशात स्वच्छतासुद्धा तेवढीच महत्वाची ठरते. जर तुम्ही स्वच्छता राखली नाही तर तुम्हाला इतर काही समस्या देखील येऊ शकतात.

अस्वच्छता, विशेषतः सॅनिटरी पॅड वेळेवर न बदलल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. तुम्ही मासिक पाळी सुरू असताना दर चार तासांनी पॅड बदलण्याची शिफारस तज्ञ करतात.

दर 4 तासांनी सॅनिटरी पॅड बदलणे का महत्त्वाचे आहे?

स्त्रीरोग तज्ञांच्या मते, बहुतेक स्त्रिया त्यांच्या रक्तप्रवाहानुसार पॅड बदलतात. तथापि, तुमचा रक्त प्रवाह जास्त किंवा कमी असला तरी काही फरक पडत नाही, तुम्ही दर 4 तासांनी पॅड बदलले पाहिजेत. यामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका टाळता येईल आणि जर तुम्ही दिवसभर पॅड बदलला नाही तर तुम्हाला संसर्गाचा धोका आणखी वाढू शकतो. याशिवाय, तुम्हाला तुमच्या योनी आणि मासिक पाळीशी संबंधित अनेक हानिकारक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

मासिक पाळी दरम्यान पॅड न बदलल्यास...

दुर्गंधी पसरते

जर तुम्ही पॅड बदलले नाही तर गोठलेले रक्त आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जीवाणूंमुळे दुर्गंधी पसरू शकते.

संसर्ग

साठलेले रक्त आणि बॅक्टेरिया संसर्गास कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे योनिमार्गात संसर्ग होऊ शकतो.

फंगल इनफेक्शन

जर पॅड बराच काळ बदलले नाही तर ओलावा निर्माण होऊ शकतो जो फंगल इनफेक्शनचा (Disease) धोका वाढवू शकतो.

खाज सुटणे आणि जळजळ होणे

जास्त वेळ पॅड न बदलल्याने योनीमध्ये ओलावा वाढल्याने खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.

रक्त प्रवाह कमी किंवा जास्त असला तरीही तुम्ही तुमचं पॅड वेळेवर बदलावं. याशिवाय तुम्हाला ओले वाटू लागल्यावर लगेच जाऊन पॅड बदला. तुमचा प्रवाह हलका असला आणि तुमचं पॅड स्वच्छ असलं तरीही ते बदला. तुम्हाला 4-5 तासांपेक्षा जास्त काळ एक पॅड वापरण्याची गरज नाही. (Health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT