Solapur Researcher Finds Plastic Eating Bacteria sakal
आरोग्य

Plastic Eating Bacteria: काय सांगता, प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूचा शोध लागलाय, तेही आपल्या सोलापूरात?

Solapur Researcher Finds Bacteria That Can Eat Plastic Naturally: सोलापूरमध्ये प्लास्टिक खाणाऱ्या जीवाणूचा शोध लागला, ज्यामुळे पर्यावरणासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.

Anushka Tapshalkar

How Solapur Scientist’s Plastic-Eating Bacteria Could Change Waste Management: काल नुकताच पर्यावरण दिन साजरा झाला. आणि या वर्षीची थीम होती "प्लास्टिक प्रदूषण हटवा". याच थीमला आगदी शोभेल असा शोध समोर आला आहे. प्लास्टिकच्या वाढत्या ढिगाऱ्याने पर्यावरणाची घुसमट सुरू असतानाच सोलापूरच्या एका अभ्यासकाने आशेचा किरण दाखवला आहे. "प्लास्टिक खाणारे" जीवाणू शोधून पंकज सुतकर यांनी पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे.

हीच चार वर्षांची चिकाटी, प्रयोग आणि जिद्दीतून उभे राहिलेले हे संशोधन आता जागतिक स्तरावरही पोहोचू लागले आहे. हा शोध नवी आशा घेऊन आला असून त्यासाठी पेटंट नोंदवण्याचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

प्रयोगशाळेपासून प्रयोगापर्यंत

पंकज सुतकर यांनी मातीतील वर्षांनुवर्षे साचलेल्या प्लास्टिकच्या तुकड्यांवर वाढणारे सूक्ष्मजीव गोळा करून त्यांचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी जनुकीय तपासणीसह तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांचा अभ्यास सखोल केला. सुतकर यांनी सुमारे १० वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू शोधले, जे विविध प्रकारच्या प्लास्टिकचे ६५ टक्के पर्यंत विघटन करू शकतात.

संशोधनाचे महत्त्व

प्लास्टिकसारख्या कृत्रिम पदार्थाचे नैसर्गिकरीत्या विघटन होणे कठीण असते, पण या जीवाणूंमुळे तो बदल शक्य होतो. सुतकर यांचे हे संशोधन राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवत आहे. त्यांच्या शोधामुळे पर्यावरणासाठी एक नवा पर्याय निर्माण झाला आहे.

पुढील टप्पा - ‘इको डस्टबिन’

पंकज सुतकर आता अशा कचरापेटीच्या निर्मितीवर काम करत आहेत, ज्यात या जीवाणूंचा वापर करून प्लास्टिक सहज नष्ट होईल. या पद्धतीमुळे प्लास्टिकचा कचरा मातीत मिसळल्यावर पर्यावरणावर कोणताही त्रास होणार नाही.

सोलापूर विद्यापीठाचे मार्गदर्शन

या संशोधनासाठी पर्यावरण विभाग प्रमुख डॉ. विनायक धुळप यांनी सुतकर यांना मार्गदर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: पाचोर्‍यातील कृष्णापुरीतील उपद्रवी माकडाला पकडण्यात यश

SCROLL FOR NEXT