positive thinking niramay wellness center swasthyam 2023 pune Sakal
आरोग्य

Suhana Sakal Swasthyam 2023 : सकारात्मक विचारातून मिळवा उत्तम स्वास्थ्य

निरामय वेलनेस सेंटर मांडणार स्वसंवादाचे महत्त्व

सकाळ वृत्तसेवा

Suhana Sakal Swasthyam 2023: आपण जे विचार करतो त्यानुसार विचारांचे तरंग निर्माण होतात. ते तरंग आपल्या शरीर व मनावर चांगले किंवा वाईट परिमाण करतात. ज्याला आपण सुख किंवा दुःख, आरोग्य किंवा अनारोग्य म्हणून ओळखतो.

त्यामुळे आपल्याला जसे परिमाण हवे आहेत, तसे तरंग निर्माण करायला हवेत. त्यासाठी काय विचार करायला हवा, याचा अभ्यास आपण ‘स्वास्थ्यम्’च्या माध्यमातून करणार आहोत. त्या अभ्यासातून आपले जीवन सुखी व निरोगी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘निरामय वेलनेस सेंटर’च्या संचालिका अमृता चांदोरकर यांनी दिली.

आपले विचार, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आणि त्या ऊर्जेचा शरीरावर होणारा परिणाम, तसेच विविध मुद्रांचा (मुद्राशास्त्र) आपल्या शरीरावर होणार परिणाम या विषयांवर सेंटरच्या माध्यमातून ‘स्वास्थ्यम्’मध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना चांदोरकर यांनी सांगितले की, ‘निरामय वेलनेस सेंटर’ हे सुरुवातीपासूनच ‘स्वास्थ्यम्’ या संकल्पनेवर काम करत आहे. स्वास्थ्य म्हणजे स्वतःमध्ये स्थिर असणे. जोपर्यंत आपण स्वतः शांत किंवा स्थिर होत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ होऊ शकत नाही.

हीच स्वस्थता प्रत्येकाला मिळावी यासाठी ऊर्जेच्या माध्यमातून सेंटर गेली १३ वर्षे कार्यरत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये आणि धकाधकीच्या जीवनामध्ये मनःशांती हरवत चालली आहे. विचार हे वस्तुनिष्ठ झालेले आहेत. यात बदल घडावा यासाठी ‘निरामय’चे स्वयंपूर्ण उपचार कार्य करतात.

घडणारी प्रत्येक चांगली किंवा वाईट गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. शरीरात घडणाऱ्या बदलांनाही कारणे असतात. जोपर्यंत आपल्याला कारण कळत नाही, तोपर्यंत त्यावर उपाय देखील मिळत नाही.

सध्या आपण कारण समजावून न घेता उपाय करीत आहोत. त्यामुळे आणखी खोलात जात आहोत. आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास झालेला आहे. आजाराच्या मुळावर कार्य करण्याच्या पद्धती पूर्वी विकसित होत्या.

त्याचाच अभ्यास करून ‘निरामय’ची स्वयंपूर्ण पद्धती विकसित झाली आहे. आपण स्वतःला कसे ओळखावे आणि स्वतःमध्ये योग्य बदल कसे करावेत. स्वसंवाद कसा साधावा हे जाणून घेण्यासाठी ‘स्वास्थ्यम्’मध्ये भेटण्याचे आवाहन चांदोरकर यांनी केले आहे.

विचार बदलण्याची प्रक्रीया मांडण्याचा प्रयत्न

योगशास्त्र आणि निसर्गोपचार यावर आधारित या उपचारांमध्ये प्रामुख्याने मनाची स्वच्छता केली जाते. कारण प्रत्येक गोष्ट ही मनच घडवत असते. जसा विचार तसा आचार आणि जसा आचार तसा त्याचा परिणाम होत असतो.

मनातील नाकारात्मकता घालवून तिथे सकारात्मकता आल्यामुळे विचार बदलतात. त्यातून आचार व परिणाम देखील बदलत जातात. हेच मांडण्याचा प्रयत्न ‘स्वास्थ्यम्’च्या माध्यमातून केला जाणार आहे, असे चांदोरकर यांनी सांगितले.

सध्या आपण आजाराच्या लक्षणांवर विचार करतो. पोट दुखत असेल तर पोट दुखीच्या गोळ्या घेतो. पण पोट का दुखत आहे किंवा ते काय सांगत आहे, यावर आपण विचार करत नाही. मात्र आपण जर अंतर्मुख झालो तर प्रत्येक गोष्टीचा उपाय हा आपल्याला आपल्या आत मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘शांतता आणि स्वास्थ्यासाठी स्वसंवाद’

कधी - दोन डिसेंबर

वेळ - दुपारी १२.४५ ते १.१५

कुठे - पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT