pregnancy tips 
आरोग्य

प्रेगनेंसीमध्ये बाळाच्या सुदृढ वाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश कराल?

या काळात तुम्ही पौष्टिक आहार, फळे, प्रथिने असा सर्वसमावेशक आहार घेणे आवश्यक असते.

सकाळ डिजिटल टीम

गर्भावस्थेत महिलांना कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत यासाठी सल्ला दिला जातो. आहारतज्ज्ञही यासंदर्भात सांगत असतात. या काळात तुम्ही पौष्टिक आहार, फळे, प्रथिने असा सर्वसमावेशक आहार घेणे आवश्यक असते. लोह, फॉलिक अॅसिड आणि आयोडीन यांसारख्या पोषकतत्त्वे असलेले पदार्थ खाण्यावर भर द्यावा असे डॉक्टर सांगतात.

आहारात कॅल्शियमचे प्रमाण ठेवल्याने बाळांची वाढ चांगली होते. तुमचे शरीर तुम्हा दोघांना पोषण देत असते. गर्भधारणेदरम्यान, आपल्याला अधिक कॅलरी खाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जास्त कॅलरी असलेले फॅट आणि जंक फूड खाऊ नका. गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. तो आहार कसा असावा यासंदर्भात आज आपण काही गोष्टी सांगणार आहोत.

दही किंवा स्मूदी

जर तुम्हाला काही थंड आणि स्वादिष्ट खायचे असेल तर दही स्मूदी वापरून पहा. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर असते जे बाळाच्या हाडे आणि दातांच्या विकासासाठी आवश्यक असते. दही स्मूदी हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे या दिवसात हे खाणे केव्हाही उत्तम असते.

एवोकॅडो

एवोकॅडो इतर फळांपेक्षा वेगळे आहे. कारण त्यामध्ये कर्बोदकांऐवजी चरबी म्हणजेच फॅट तुलनेत अधिक असते. ते केवळ मलईदार आणि स्वादिष्टच नाहीतर फायबर, पोटॅशियम आणि 'व्हिटॅमिन सी' युक्त असते. त्यामुळे एवोकॅडो हे शरीरासाठी पोषक आणि फायदेशीर आहे.

केळी

पोटॅशियमच्या जगातील सर्वोत्तम स्त्रोतांपैकी केळी आहेत. त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि फायबर देखील जास्त असतात. केळीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात.

काजू

बदाम, काजू, पिस्ता किंवा अक्रोड गरोदरपणात खूप फायदेशीर असतात. कारण त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. हे फॅटी अॅसिड बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खूप चांगले काम करते. त्यामुळे गर्भावस्थेत डॉक्टर काजू खाण्याचा सल्ला देतात. किंवा काजूचे पदार्थ खाण्यासही सांगतात.

ब्लूबेरी

ब्लूबेरी केवळ स्वादिष्टच नाहीत तर जगातील अँटिऑक्सिडंट्सच्या सर्वात शक्तिशाली स्त्रोतांपैकी एक आहेत. ब्लूबेरीचाीही आहारात समावेश करणे आवश्यक आहे.

संत्री

संत्री हे फळ व्हिटॅमिन सी साठी खास ओळखली जातात. त्यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त असतात. गरोदरपणात हे खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. आणि शरीरात हिमोग्लोबीनता स्तर योग्य राहण्यासाठी मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT