Morning Sickness in Pregnancy esakal
आरोग्य

Morning Sickness in Pregnancy : गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांना सकाळी उलट्या का होतात? हे घरगुती उपाय करा

हे घरघुती उपाय करत तुम्ही त्रास कमी करू शकता

सकाळ ऑनलाईन टीम

Morning Sickness in Pregnancy : गरोदर महिलांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशातच सकाळी उठल्यावर अस्वस्थ वाटणे यांसारख्या समस्या गरोदरपणात येऊच शकतात. तेव्हा वेळेवर नेमके काय करावे हेही सुचत नाही. पण अशा वेळी घाबरू नका. हे घरघुती उपाय करत तुम्ही त्रास कमी करू शकता.

अनेकदा गरोदर महिला या वर्किंगही (Working Pregnant Women) असतात. त्यांना ऑफिसच्या शिफ्टमध्येही हा त्रास होऊ शकतो. अनेकदा महिलांना सकाळी सकाळी उलट्यांचा त्रास होतो आणि अवस्थही वाटते. तेव्हा जाणून घेऊया की अशावेळी गरोदर महिलांनी कशी (Morning Sickness in Pregnancy) काळजी घ्यावी आणि जर का सकाळी उलट्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही काही घरगुती उपायही फॉलो करू शकता. घरच्या साहित्यांचा वापर करून तुम्ही त्याचा वापर तुमच्या आहारात करू शकता. 

आजच्या महिला या वर्किंग असतात तेव्हा त्यांना ऑफिसला जाता जाता प्रवासादरम्यानही त्रास होऊ शकतो. अशावेळी आपल्याकडे योग्य त्या खाण्यापिण्याच्या गोष्टीही असणे आवश्यक असते. त्यातून जेवणातही योग्य ते बदल करून घ्यावे लागतात. तुम्हाला जेवणात जास्त आयरन असलेले पदार्थ घेता येतात. शक्यतो ताकद वाढविणाऱ्या गोष्टी खाणं गरजेचे आहे. 

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस का येतो?

प्रेग्नन्सीमध्ये सुरूवातीला तुम्हाला हॉर्मोनल बदलांमुळे (Diet for Pregnancy) त्रास होतो. त्यामुळे आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. अशावेळी उलट्या होण्याचा त्रास अनेकदा होतो. त्यामुळे थकवा जाणवू शकतो. एव्हाना तुमची मासिक पाळी बंद होते त्यातून प्रेग्नन्सीच्या पाचव्या आठवड्यानंतर हा त्रास सुरू होतो. 

हे घरघुती उपाय करा

यावेळी तुम्हाला व्हिटॅमिन सी (Vitamin C) असलेले पदार्थ खाऊ शकता ज्यानं तुमची ताकद वाढते. तेव्हा अशावेळी फळं खा. आयरन असलेले पदार्थ खा. ज्यात तुम्ही पालेभाज्या खाऊ शकता. तुम्हाला जास्त मळमळ आणि उलट्या होत असतील तर तुम्ही पुदिना आणि आलं खाऊ शकता. अशावेळी लिंबू पाणीही पिऊ शकता. (Health)

अनेकांना मार्निंग वॉकला जाण्याची सवय असतेच. तेव्हा त्यावेळी तशाप्रकारे विटॅमिन सी असणार ज्यूसेस बरोबर ठेवणं गरजेचे आहे. अनेकदा नाश्त्याच्या वेळीही काही खाल्लं की उलटयांचा त्रास होतो त्याचसोबत रिकामी पोटीही होऊ शकतो. 

गरोदरपणात आपल्या शरीराच्या अवस्थेनुसार आपल्याला त्रास होतो. परंतु योग्य आहार आणि व्यायामाचा समावेश करणे आवश्यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Stock Market Holiday: 3 एप्रिलला शेअर बाजार बंद? सलग 3 दिवस बाजार बंद राहणार! जाणून घ्या अपडेट

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

SCROLL FOR NEXT