आरोग्य

कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रोटिन्सचं रुटीन ठरतंय फायद्याचं

सुयोग घाटगे

कोल्हापूर : प्रोटिन्स म्हणजेच (proteins) प्रथिने ही शरीराची एक महत्त्‍वाची गरज आहे. ताकदवान बनवण्याबरोबरच रोगप्रतिकारक (immunity power) शक्ती वाढीसाठी ती अधिक फायद्याची आहेत. सध्याच्या परिस्थितीत ज्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली, तेच कोरोनाशी (fight to corona) अधिक सक्षमपणे लढू शकतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांचे रुटीन ठेवले, तर निश्‍चितच कोरोनाला दूर ठेवण्यास मदत होऊ शकते.

बरेच लोक प्रोटिन्सची कमतरता भरून काढण्यासाठी प्रोटिन शेक (proteins shek) अथवा सप्लिमेंट्स घेतात. परंतु हे कृत्रिम पदार्थ आरोग्यासाठी (dangerous to health) अपायकारकही ठरू शकतात. यामुळे प्रथिनयुक्त नैसर्गिक घटकांचा आहारामधील समावेश हे अधिक फायदेशीर आहे. प्रोटिन्समध्ये आवश्यक अॅमिनो अ‍ॅसिड असते. एका दिवसाला पुरुषाच्या शरीराला सरासरी ५६ ग्रॅम, तर स्त्रीला सरासरी ४६ ग्रॅम प्रोटिन लागते. मुख्यत: प्रोटिन्स शरीराच्या वाढीसाठी, नवीन पेशी तयार करण्यासाठी, हार्मोन्स तयार करण्यासाठी लागतात. जास्तीची प्रोटिन्स जास्त ताकद देतात, स्नायू वाढवायला मदत होते, हा एक गैरसमज आहे. पण खेळाडूंना जास्त प्रोटिन्सची आवश्यकता असते.

प्रोटिन्स आणि मांसाहार

मांसाहारी पदार्थातून मिळणारी प्रोटिन्स जास्त चांगल्या प्रकारे शरीरात वापरली जातात. त्यांचे शोषण चांगले होते. परंतु त्यात तेवढ्याच प्रमाणात चरबी असल्याने मांसाहाराचे प्रमाण नियंत्रित हवे. ज्या स्रोतातून सर्व प्रकारची ॲमिनो अ‍ॅसिड्स मिळतात, ते सर्वात चांगलं प्रोटिन्स समजले जाते. मांसाहार, दूध, सोयाबीन यातून सर्व ॲमिनो अ‍ॅसिड मिळतात.

परिणाम

आहारात गरजेपेक्षा कमी प्रमाणात प्रोटिन्स असतील तर केस, नखे, त्वचेचे आरोग्य बिघडते. जास्त प्रमाणात घेतली तर किडनीवर ताण येतो. चयापचयातील तयार झालेली आम्ले कमी करण्यासाठी हाडांमधील कॅल्शियम रक्तात मिसळले जाते आणि हळूहळू हाडांची दुखणी सुरू होण्याची शक्यता असते. प्रोटिन्स उष्मांकाच्या स्वरुपात शरीरात साठवली जातात. शरीराची हालचाल किंवा व्यायाम नसेल तर लठ्ठपणा वाढतो. काही वेळा प्रोटिन सप्लिमेंट (पावडर, गोळ्या) घेण्याचा सल्ला दिला जातो, मात्र अन्नघटकांतून मिळालेली प्रोटिन्स आरोग्यासाठी अधिक चांगली असतात.

प्रोटिन्स मिळवा यातून

शेंगदाणे :

शेंगदाणा हा प्रोटिनचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. १०० ग्रॅम शेंगदाणे शरीराला २६ ग्रॅम प्रोटिन देतात.

सोयाबीन :

सोयाबीनमधून भरपूर प्रमाणात प्रोटिन मिळते. १०० ग्रॅम सोयाबीनमुळे शरीराला जवळपास ५० ग्रॅम प्रोटिन मिळते.

ओट्स :

ओट्स हा प्रोटिनचा चांगला स्रोत आहे, तसेच त्यामध्ये बीटा ग्लुकेन्सदेखील आहेत. यामुळे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी होते. १०० ग्रॅम ओट्समधून १२ ग्रॅम प्रोटिन मिळते.

काळे चणे :

सहज उपलब्ध होणारे काळे चणे देखील प्रोटिन्सचा उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. १०० ग्रॅम चण्यांमध्ये १९ ग्रॅम प्रोटिन असते.

हेही ठेवा लक्षात

  • रोजच्या जेवणात दूध आणि दुधाचे पदार्थ जसे दही, ताक, पनीर यातील एकाचा तरी समावेश करावा.

  • सोयाबीन, सोयामिल्क, सोया पनीर, सोयाचंक्सचा समावेश करावा.

  • रोज एक अंड्याचा पांढरा भाग प्रोटिन म्हणून खाऊ शकता.

"सध्याच्या परिस्थितीत सदृढ आणि सशक्त शरीर ही मोठी संपत्ती ठरत आहे. ज्यांची रोग प्रतिकारकशक्ती चांगली, त्यांचा संसर्गजन्य आजारापासून बचाव देखील अधिक चांगल्या प्रकारे होतो. हे पाहता कोरोनाच्या बिकट परिस्थितीत योग्य प्रोटिनयुक्त खाणे हे आरोग्यवर्धक ठरणारे आहे."

- डॉ. प्रवीणा गिरी, आहारतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT