santulan oil sakal
आरोग्य

तर काय?

माझ्या आईचे वय ५० वर्षे आहे. तिचे सतत पाय दुखतात, थकवा जाणवतो, काही काम केल्यास पाठ दुखते, सांधे व हाताची बोटे दुखतात.

सकाळ वृत्तसेवा

माझ्या आईचे वय ५० वर्षे आहे. तिचे सतत पाय दुखतात, थकवा जाणवतो, काही काम केल्यास पाठ दुखते, सांधे व हाताची बोटे दुखतात. तिची पाळी बंद झालेली आहे. थोड्या फार प्रमाणात तिची चिडचिडही होते. मी व बाबा तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण तिच्या दुखण्यावर काही उपाय मिळाला तर बरे होईल. मला बहीण नाही म्हणून मला तिची जास्त काळजी वाटते.

- अनिकेत घोगरे, पुणे

उत्तर - स्त्रियांमध्ये वय वाढल्यावर तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी वाताचे असंतुलन फार प्रमाणात दिसते. अंग दुखणे, चिडचिड होणे, थकवा वाटणे वगैरे याची सामान्य लक्षणे होत. सध्या तरी वातशमनाच्या दृष्टीने आईला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल संपूर्ण शरीराला, संतुलन शांती सिद्ध तेल सांध्यांना व संतुलन कुंडलिनी सिद्ध तेल पाठीला नियमितपणे लावायला सांगावे. हॉर्मोन्सचे असंतुलन कमी करण्याच्या दृष्टीने फेमिसॅन तेलाचा पिचू नियमितपणे ठेवण्याचा उपयोग होऊ शकेल. या काळात शरीरात सर्व प्रकारचे घटक कमी पडू लागतात, यासाठी स्त्रीसंतुलन कल्प घालून दूध घेणे, आठवड्यातून २-३ वेळा तरी खारकेचे दूध घेणे, संतुलन धात्री रसायनसारखे रसायन घेणे उत्तम राहील. याच काळात शरीरात पोषकत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते, यासाठी कॅल्सिसॅन गोळ्या, मॅरोसॅन हे रसायन नियमित घेणे इष्ट. रक्ताची तपासणी करून व्हिटॅमिन बी १२ व बी ३ यांची पातळी बघून घेणे बरे राहील. आई-वडिलांची काळजी घेणे हे मुला- मुलींचे कर्तव्यच आहे, त्यामुळे तुम्ही आईची काळजी घेऊन प्रश्र्न विचारला आहे ही चांगली गोष्ट आहे. जास्त त्रास वाटल्यास प्रत्यक्ष सल्ला घेतल्याचा जास्त फायदा होऊ शकेल.

मी माझ्या मोठ्या मुलाच्या वेळी डॉ. बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्कारांचे पालन केले होते. त्यावेळी झालेल्या अपत्याची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली आहे, त्याला कधीही सर्दी-खोकल्याचा त्रास झाला नाही. आता माझे दुसरे बाळ आठ महिन्यांचे आहे. यावेळी आम्हाला कुठल्याही गोष्टींचे पालन करणे जमले नाही. या बाळाला वारंवार सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. आता मी संतुलन बालामृत मागवले आहे, पण बरोबरीने खोकल्यासाठी काही उपाय करता येईल का ?

- आशालता देशमुख, बीड

उत्तर - तुम्ही बाळाला बालामृत देणे सुरू करणार आहेत हे उत्तमच आहे. खोकल्याचा त्रास होत असल्यास संतुलन सितोपलादी चूर्ण संतुलनच्या मधाबरोबर सकाळ-संध्याकाळ चाटवावे. लहान मुलांना एक अष्टमांश वा एक चतुर्थांश चमचा संतुलन सितोपलादी चूर्ण देता येते. तसेच दिवसातून २-३ वेळा ब्राँकोसॅन कफ सिरप देण्याचाही फायदा होऊ शकेल. ओव्याच्या पुरचुंडीने त्याचे सायनेस, गळा व छाती शेकावी. त्याआधी शक्य झाल्यास संतुलन अभ्यंग तेल छातीला लावावे. बाळ आठ महिन्यांचे आहे याचा अर्थ तुम्ही बाळाला कदाचित स्तन्यपान करत असाल. अशा वेळी तुम्ही स्वतः गरम पाणी घेणे, च्यवनप्राशसारखे रयान घेणे उत्तम राहील, तुमच्या आहारातून कफवर्धक पदार्थ, गार पाणी, फळे वगैरे गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: शिक्षक बदल्यांवरून वाद! भिवंडी शाळांमध्ये पर्यायी नियुक्ती न झाल्याने शिक्षण व्यवस्थेवर ताण

Cruise Accident: आईने मुलाला लाइफ जॅकेटमध्ये कवटाळून ठेवले... पण दोघांचाही श्वास थांबला! क्रूझ दुर्घटनेत हृदय पिळवटून टाकणारा क्षण

पत्नीची साडी प्रेस करून दे म्हणत वसतीगृहातील मुलीला घरी बोलवलं अन् रुमध्ये नेऊन...; सेवानिवृत्त प्राचार्याच गैरकृत्य

IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

प्रसिद्ध अभिनेत्रीनं दाखवले ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीचे निशाण; म्हणाली ‘हे डाग नाहीत, धैर्याचं प्रतीक आहे’

SCROLL FOR NEXT