Health Care  esakal
आरोग्य

Health Care : रेड वाईन प्यायल्याने फायदा होतो की नुकसान? संशोधनातून झाला खुलासा

नवीन वर्षाला आजपासून सुरूवात झाली आहे. या नव्या वर्षाचा उत्साह आपल्याला सर्वत्र पहायला मिळतो. हे नवे वर्ष साजरे करण्यासाठी अनेक जण पार्टी करतात. या पार्टीमध्ये ड्रिंक्स देखील केले जाते.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : नवीन वर्षाला आजपासून सुरूवात झाली आहे. या नव्या वर्षाचा उत्साह आपल्याला सर्वत्र पहायला मिळतो. हे नवे वर्ष साजरे करण्यासाठी अनेक जण पार्टी करतात. या पार्टीमध्ये ड्रिंक्स देखील केले जाते.

या दिवसांमध्ये थंड वातावरणात रेड वाईन पिण्यास अनेक जण प्राधान्य देतात. रेड वाईनला अनेक जण हेल्दी ड्रिंक मानतात. रेड वाईन ही हृदयासाठी देखील फायदेशीर मानली जाते. मात्र, याच्याशी संबंधित करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, रेड वाईन हे इतर अल्कोहोलिक ड्रिंक्सइतकेच धोकादायक असू शकते.

रेड वाईन प्यायल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते, होयं हे अगदी खरं आहे. रेड वाईनला काही जण चांगले मानतात. परंतु, याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून हे समोर आले आहे की, इतर अल्कोहोलिक ड्रिंक्सप्रमाणेच रेड वाईन देखील यकृतासाठी हानिकारक असू शकते. रेड वाईन प्यायल्याने फॅटी लिव्हर, डायबिटीज इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.

या संशोधनानुसार, रेड वाईन प्यायल्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम हा हृदयावर होऊ शकतो. तसेच, रेड वाईन प्यायल्यामुळे हृदयाजवळील रक्तवाहिन्यांच्या रिसेप्टर्सवर ही याचा परिणाम होतो. यामुळे, भविष्यात उच्च रक्तदाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेड वाईन असुदे किंवा कोणतेही अल्कोहोल याचे सेवन केल्याने तुमचे हार्मोनल संतुलन बिघडू शकते, असे ही या संशोधनातून समोर आले आहे. त्यासोबतच अल्कोहोल हे शरीरातील कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन्सवर परिणाम करते.

त्यामुळे, त्याचे प्रमाण वाढते. शिवाय, हृदयाचे ठोके देखील अचानक वाढतात. त्यामुळे, रेड वाईन किंवा कोणतेही अल्कोहोल जरी असले तरी त्याचे सेवन करणे टाळा. यामुळे, आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT