Reduce Belly Fat esakal
आरोग्य

Reduce Belly Fat : एकाच जागी बसून कामाने पोट सुटलंय? मग या दोन पदार्थांना कायमचा ठोका रामराम

ऑफीसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने पोट आणि कंबरेभौतीची चरबी वाढते.

धनश्री भावसार-बगाडे

Avoid These 2 Food Items To Reduce Belly Fat : ऑफीसमध्ये तासन् तास एकाच जागी बसून काम केल्याने पोट आणि कंबरेभौतीची चरबी वाढते. ही आता बहुतेकांची फारच सामान्य समस्या झाल्याचं बघायला मिळतं. या बसून कामाने सुटलेलं पोट आणि कंबर तुमचा लुकच खराब करतात.

लठ्ठपणामुळे डायबेटीस, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, बीपी, हार्ट अॅटॅक असे अनेक आजार होऊ शकतात. पण जर पोटावरची चरबी दूर करायची असेल तर मुख्यत्वे आहारातून हे दोन पदार्थ दूर करायला हवेत.

बसून काम करण्याचे तोटे

ऑफीसमध्ये साधारणतः कमीत कमी ९ तास बसून काम केलं जातं. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याच्या शक्यता वाढतात. मायो क्लिनीकने केलेल्या अभ्यासानुसार ८-१० तास एकाच पोझीशनमध्ये बसून काम केल्याने पोटावर आणि कंबरेवर चरबी वाढते. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

Reduce Belly Fat

स्नॅक्स आणि खारट पदार्थ

जे लोक तासन् तास बसू काम करतात ते बऱ्याचदा चहा बिस्कीट, वफर्स, खाकरा, तळलेले पदार्थ खाताना दिसतात. पण याच खारट पदार्थांनी शरीरातले कॅलरीज वाढतात आणि वजन झटपट वाढवतात. त्यामुळे तुमच्या आहारातून, स्नॅक्समधून असे खारट पदार्थ कायमचे काढून टाका.

Reduce Belly Fat

तेलकट पदार्थ

भारतात सामान्यपणे जास्त तेलकट पदार्थ खाल्ले जातात. हे तेलकट पदार्थ शरीरात गेल्याने अधिक फॅट जमा होतात आणि अधिक कॅलरीज वाढतात. ज्या व्यक्ती बसून काम करतात त्यांच्या कॅलरीज बर्न होत नाही. त्यामुळे शरीरात लठ्ठपणा वाढतो. त्यामुळे जर तुमची शारीरिक हालचाल कमी होत असेल तर तेलकट पदार्थ खाणं सोडून द्या. हेल्दी डाएट करणं फार आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT