Brain Disease  google
आरोग्य

Brain Disease : मेंदूविकाराने ग्रस्त आफ्रिकी मुलाला महाराष्ट्रीय डॉक्टरने दिले जीवदान

आयव्हरी कोस्टमध्ये राहणारा बुर्किना फासो येथील ७ वर्षांच्या मुलाला काही सर्वांगीण विकासात अडचणी येत होत्या.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट येथील घातक आरोग्य परिस्थितीमुळे मेंदूसंबंधी विकाराने पिडीत एका सात वर्षांच्या मुलावर रीजनरेटिव्ह मेडिसिनच्या सहाय्याने यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

या उपचारपद्धतीमुळे मुलासह अनेक अशा रूग्णांना नव्याने आयुष्य मिळाले आहे. रिजनरेटिव्ह मेडिसिनचे संशोधक आणि संस्थापक सीईओ, डॉ. प्रदीप महाजन यांच्या नेतृत्वाखालील टीमने रूग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. (regenerative medicine therapy for brain disease )

आयव्हरी कोस्टमध्ये राहणारा बुर्किना फासो येथील ७ वर्षांच्या मुलाला काही सर्वांगीण विकासात अडचणी येत होत्या. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याची शारीरिक वाढ होत नव्हती. स्टेमआरएक्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेतल्यानंतर त्याच्या वडिलांनी या उपचार पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.

उपचार केल्यानंतर, रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. त्याच्या उपचाराकरिता नव्याने विकसित सँडविच प्रोटोकॉलचा वापर करण्यात आला. या थेरपीमुळे मुलाच्या प्रकृतीत सुधारणा पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. आयव्हरी कोस्टमधील त्यांच्यासारखे इतर अनेक रुग्ण आहेत ज्यांना या थेरपीमुळे नव्याने आयुष्य मिळाले आहे.

“पुनर्जनशील औषधाचा उपयोग विविध घटकांवर उपचार करण्यासाठी केला जातो. आमच्या अत्याधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे न्यूरोलॉजिकल परिस्थिती, विकासात्मक अडचणी आणि विलंब अशा विविध वैद्यकीय परिस्थितींवर प्रभावी उपचार शोधणाऱ्या रुग्णांसाठी हे वरदान ठरले आहे.

आयव्हरी कोस्ट येथील बुर्किना फासो येथील काही रूग्णांना या थेरपीमुळे प्रचंड फायदा झाला आहे. आमचे उच्च प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिक आणि अत्याधुनिक सुविधा हे सुनिश्चित करतात की रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्तम काळजी मिळेल.”

“सर्वच रूग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल आणि वर्तणुकीतील बदलांसह भाषण आणि बौद्धिक स्तरावरही तितकीच सुधारणा दिसून आली आहे. याठिकाणी प्रदान करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये टार्गेटेड थेरेपी, क्वांटम एनर्जी मेडिसिन ट्रान्सक्रॅनियल, चुंबकीय आणि इलेक्ट्रिकल डायरेक्ट स्टिम्युलेशनचा समावेश आहे.

ज्यामध्ये जैविक सेल नियमनासाठी वापरल्या जाणार्‍या मायक्रोकरंटसह नव्याने तयार केलेल्या सँडविच प्रोटोकॉलचा समावेश आहे. आम्ही जगभरातील रुग्णांना नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपचार देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मला विश्वास आहे की एक दिवस असा येईल जेव्हा उपचारांमध्ये गोळ्याऐवजी मानवी शरीरातील पेशींचा वापर केला जाईल.’’

मुलाचे वडील इल्बोडो म्हणाले की, “लहानपणापासून हा मुलगा एका ठिकाणी लक्ष केंद्रीत करू शकत नव्हता. तो रडत सुद्धा नव्हता. अन्य लहान मुलांप्रमाणे याचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होत नव्हता.

मुलाची प्रकृती पाहून आम्ही खूप चिंतेत होतो. परंतु, डॉ. महाजन यांनी तातडीने उपचार करून आमच्या मुलाला नव्याने जीवनदान दिले आहे. आमच्या मुलाचे प्राण वाचविल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT