risk of measles infection Precautions must be taken Free vaccinations from Govt child care health doctor
risk of measles infection Precautions must be taken Free vaccinations from Govt child care health doctor  esakal
आरोग्य

Measles Infection : गोवरचा धोका, वेळीच ओळखा

सकाळ वृत्तसेवा

गोवर आजाराने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात १५,३५६ संशयित रुग्ण आढळून आले, पैकी ९९१ जणांना आजार असल्याचे निदान झाले आहे. तर १९ जण या आजारामुळे दगावले आहेत. हा आजार अति वेगाने पसरला जाणारा आजार म्हणून ओळखला जातो. विशेष करून लहान मुलांना होणारा आजार महाराष्ट्रात मोठ्यांनाही झाला आहे.‌ हा आजार आणखीनच चिंता वाढविणारा ठरला आहे. गोवर संसर्गजन्य रोग आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर १० ते १२ दिवसांनंतर लक्षणे दिसू लागतात आणि ७ ते १० दिवसांपर्यंत टिकतात. गोवर हा हवाजनित रोग आहे, जो संसर्ग झालेल्या लोकांच्या खोकल्यामुळे आणि शिंकण्यामुळे सहज पसरतो. तोंड किंवा नाकातील स्राव यांच्या थेट संपर्काद्वारे पसरू शकतो. रोगप्रतिकार करू शकत नसलेल्या आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीबरोबर राहण्याची जागा सामायिक करणाऱ्या दहापैकी नऊ जणांना हा संसर्ग होईल. पुरळ सुरू झाल्याच्या चार दिवसांपूर्वी ते चार दिवसांच्या नंतर पर्यंत असे लोक इतरांसाठी संसर्गजन्य असतात.

लक्षणे

  • ताप, खोकला, वाहणारे नाक आणि डोळ्यांची जळजळ

  • तोंडात आणि शरीरावर पांढरे किंवा लाल पुरळ उठतात

  • सामान्य गुंतागुंतींमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग आणि न्यूमोनिया होऊ शकतो

  • काही प्रमाणात फेफरे, अंधत्व किंवा मेंदूची जळजळ होते.

खबरदारी

  • बालकांना आवश्यक त्या लशी वेळेवर द्याव्यात

  • गोवर उठलेल्या मुलांना आजार बरा होईपर्यंत शाळेत पाठवू नये

  • गोवर उठलेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे

  • गोवर असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास हात साबणाने धुवावेत

  • परिसरात गोवरची साथ आल्यास मास्कचा वापर करावा

  • दूषित हातांचा स्पर्श तोंड, डोळे यांना होणार नाही याची काळजी घ्यावी

  • लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

गोवरचा एकही बेळगाव जिल्ह्यात रुग्ण आढळून आलेला नाही. दरवर्षी मुलांना इंद्रधनुष्‍य आरोग्य अभियान अंतर्गत सात संसर्गजन्य आजाराच्या लशी दिल्या जातात. ज्यात रूबेला संबंधी एमएमआर लशीचा समावेश आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरीही आजारासंबंधित लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

-डॉ. बी. एन. तुक्कार, जिल्हा दक्षता अधिकारी

गोवर (रुबेला) हा विषाणूंपासून संसर्गजन्य आजार आहे. हा आजार बहुतेक मुलांना होतो. इंद्रधनुष्य कार्यक्रमांतर्गत लहान मुलांना शासनाकडून यासाठी मोफत लसीकरण मोहीम राबविली जाते. त्यामुळे आजवर हा आजार आटोक्यात होता; पण महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे या संसर्गाने धुमाकूळ घातला असून आता तो कोल्हापूरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे बेळगावात हा आजार पसरण्याचा धोका असून यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्याची गरज आहे.

-विनायक जाधव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT