Weight Loss Tips esakal
आरोग्य

OMG, जास्त खाऊन नाहीतर नाश्ता स्कीप केल्याने वाढू शकतं वजन; ऋजुता दिवेकर सांगतात कारण

वजन कमी करण्यासाठी कमी खाण्यापेक्षा वेळच्या वेळी खाणे आवश्यक असल्याचे ऋजुता दिवेकर सांगतात.

धनश्री भावसार-बगाडे

Rujuta Diwekar Fitness And Weight Loss Tips :

वाढतं वजन ही हल्लीच्या काळातली मोठी समस्या झाली आहे. चुकिची खाण्यापिण्याची पद्धती, बदललेली जीवनशैनी, बैठे काम, वाढता ताण अशा वेगवेगळ्या कारणांनी दिवसेंदिवस वाढत्या वजनाची समस्याही मोठी होत आहे.

पण लोक वजन कमी करायचं म्हणजे खाणं कमी करायचं असा सरळ सरळ अर्थ लावतात. पण तो अर्थ चुकीचा असल्याचे प्रसिद्ध डाएटिशीयन ऋजुता दिवेकर सांगतात. उलट नाश्ता स्कीप केल्याने वजन वाढते असं त्या म्हणतात. कसं, ते जाणून घ्या.

सेलिब्रिटी डाएटिशीयन ऋजुता दिवेकर नेहमीच सोशल मीडियावर फिटनेस विषयी वेगवेगळ्या टिप्स देत असतात. सध्याच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात सकाळचा नाश्ता करणे टाळल्याने वेटलॉस गोल कसे फेल होते हे सांगितले आहे. वजन कमी करण्यासाठी कमी खाणे हा पर्याय नसून योग्य ते योग्य वेळेत खाणे गरजेचे आहे.

वजन नियंत्रीत करण्यासाठी नाश्ता करणे का आवश्यक आहे तीन स्टेपमध्ये जाणून घ्या.

कॅलरीचे प्रमाण

जे लोक नाश्ता करत नाहीत त्यांचा कॅलरीचा लोड हा दिवसाच्या मावळतीकडे वाढत जातो. या उलट जे लोक सकाळी नाश्ता करतात ते कॅलरीचे प्रमाण दिवसभरात मेन्टेंन करत असतात. त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्यासाठी घेतले जाणारे श्रम उपयोगात येतात.

संध्याकाळी होणारे क्रेव्हिंग्ज

जे लोक सकाळी पुरेसा नाश्ता करत नाहीत त्यांना दिवसाअखेरीस वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा वाढते. मग अशावेळी पिझ्झा, पास्ता, फ्रीज उघडून काहीतरी खावे अशी इच्छा वाढत जाते. याची परिणीती वजन वाढण्यात होते. कारण यात अतिरीक्त कॅलेरीज घेतल्या जातात ज्या वाईट असतात. शिवाय या अशा इच्छा झाल्याने आपण वजन कमी करू शकणार नाही असं वाटतं, आपली इच्छाशक्ती कमी असल्याचे वाटून आत्मविश्वास कमी होतो.

हँगर वाढतो

याचा सोपा अर्थ म्हणजे भूकेमुळे होणारी चीडचीड. जर सकाळी नाश्ता नाही केला तर दिवसभर तुमच्यात एक चीडचीडेपणा जाणवत राहतो. ज्याचा परिणाम तुमच्या कामावरही होतो. त्यामुळे सकाळी पुरेसा नाश्ता करणे फार आवश्यक असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Delhi Police Detention Row : "या पोलिसांच्या बसेस आहेत की छळ छावण्या?"; आंदोलक नेहा बोराचा बसमधून व्हिडिओ शेअर करत थेट सवाल!

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Electric Shock: जमिनीपासून अवघ्या ४ फुटांवर वीजवाहिनी; विजेचा धक्का लागून दोन म्हशींचा मृत्यू; प्रसंगावधान राखल्याने तीन म्हशी वाचल्या

SCROLL FOR NEXT