Yoga sakal
आरोग्य

इनर इंजिनिअरिंग : महत्वाकांक्षा आणि आध्यात्मिक प्रक्रिया

जगाच्या नाशाचं कारण एवढंच आहे की लोक केवळ त्यांच्या मर्यादित वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काम करत आहेत.

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

जगाच्या नाशाचं कारण एवढंच आहे की लोक केवळ त्यांच्या मर्यादित वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काम करत आहेत.

जगाच्या नाशाचं कारण एवढंच आहे की लोक केवळ त्यांच्या मर्यादित वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काम करत आहेत. महत्त्वाकांक्षेसाठी काम करण्यापेक्षा लोकांनी स्वतःच्या जीवनाविषयी आणि आसपासच्या प्रत्येक गोष्टींविषयी सखोल दृष्टी ठेवल्यास तुमचा दुसऱ्या कोणाच्या दृष्टीशी कधीच संघर्ष होणार नाही. कारण मुळात सर्व मनुष्य जीव मानव कल्याणासाठीच काम करत आहेत.

फरक केवळ एवढाच आहे की आपली मानव कल्याणासाठीच्या प्रयत्नांची व्याप्ती व्यक्तिपरत्वे वेगवेगळी आहे. एखाद्या व्यक्तीसाठी मानवकल्याण म्हणजे केवळ त्याचे किंवा तिचे स्वतःचे कल्याण असू शकते. दुसऱ्या कोणासाठी ते त्यांचे कुटुंब असू शकते. आणखी एखाद्यासाठी ते त्यांचा समाज किंवा राष्ट्र किंवा त्यांचा धर्म असू शकतो. मानव कल्याणासाठी चिंतित नसलेला या ग्रहावर कोणी नाही. प्रश्न फक्त व्याप्तीचा आहे.

आजकाल लोक मनुष्य कृती मर्यादित करण्याच्या गोष्टी बोलत आहेत. प्रत्येक मनुष्याने त्याच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी काम केल्यास दुसऱ्या कोणाच्या महत्त्वाकांक्षेबरोबर संघर्ष होणं अनिवार्य आहे. त्यांनी सर्वांचे कल्याण ही दृष्टी ठेऊन काम केल्यास आपल्या कृतीवर बंधनं आणण्याची गरज नाही. नाही तरी, तुमची इच्छा कल्याण व्हावे, चांगले व्हावे हीच आहे, मग तुम्ही तुमच्या इच्छांच्याबाबत इतके कंजूष का आहात? तुमचं मन मोठं का करत नाही? तुम्ही तुमच्या इच्छा अमर्यादित का करत नाही? माझं चांगलं झालं पाहिजे एवढाच विचार करू नका.

तुमच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षेच्या बाबतीत खरंच इतकं लोभी झालं पाहिजे की. ‘मला सगळ्या जगाचं कल्याण करायचं आहे. हे संपूर्ण अस्तित्व चांगलं असल्याचं पाहायचं आहे. सर्व जीव चांगले असल्याचं पाहायचे आहे.’ तुमची स्वतःसाठी महत्वाकांक्षा आहे ती संपूर्ण मानव जातीसाठी किंवा या पृथ्वीवरील सर्व जीवांसाठी विस्तारित करा. असं झाल्यास तुमच्या कृती मर्यादित करण्याची गरज नाही.

महत्वाकांक्षा ही समस्या झाली आहे, याचं कारण केवळ ती मर्यादित आहे म्हणून. तुम्ही तिची व्याप्ती वाढवून सर्वोच्च पातळीवर नेल्यास महत्वाकांक्षा एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे, मुक्तीची प्रक्रिया आहे. आता याक्षणी महत्वाकांक्षा ही गुंतून पडण्याची प्रक्रिया बनली आहे याचं कारण केवळ तुम्ही तिला लहान ठेवली आहे म्हणून. तुम्ही तिला खरंच सर्वोच्च पातळीवर घेऊन गेला आणि सर्वार्थाने परा कोटीचे महत्वाकांक्षी बनला तर तुम्ही आध्यात्मिक आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT