Sadguru sakal
आरोग्य

इनर इंजिनिअरिंग : शिक्षण : क्षितिजे विस्तारण्याचे साधन

स्वतःला शिक्षित करणे म्हणजे मुळात तुमची क्षितिजे विस्तारणे. एका सीमित अस्तात्वाकडून तुम्हाला स्वतःचा विस्तार करायचा आहे. दुर्दैवाने सध्या ज्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे.

सद्गुरू, ईशा फाउंडेशन

स्वतःला शिक्षित करणे म्हणजे मुळात तुमची क्षितिजे विस्तारणे. एका सीमित अस्तात्वाकडून तुम्हाला स्वतःचा विस्तार करायचा आहे. दुर्दैवाने सध्या ज्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे.

स्वतःला शिक्षित करणे म्हणजे मुळात तुमची क्षितिजे विस्तारणे. एका सीमित अस्तात्वाकडून तुम्हाला स्वतःचा विस्तार करायचा आहे. दुर्दैवाने सध्या ज्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे, त्यामुळे माहिती मिळवण्याच्या क्षमता वाढत आहेत, परंतु लोकांच्या संवेदना बोथट होत आहेत आणि आजूबाजूच्या जीवनाकडे बघण्याची समावेशक वृत्ती अत्यंत संकुचित होऊ लागली आहे.

पूर्वी पाचशे जणांचे एकत्र कुटुंब असे. पाचशे लोकांबरोबर गुण्यागोविंदाने राहण्याकरता तुमच्यात सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती असावी लागते. अशा पद्धतीने राहणारी अजूनही काही कुटुंबे आहेत; पण हे आता दुर्मीळ होत जात आहे. पाश्चिमात्य शिक्षणपद्धती आल्यापासून लोक व्यक्तिस्वातंत्र्य जपणारी आणि इतरांना सामावून न घेणारी होऊ लागली आहेत. आता कुटुंबाची व्याख्या म्हणजे मी, माझी बायको, माझी मुले इतकेच राहिले आहे आणि आपण इतर सगळ्यांना वगळत आहोत. या शिक्षणाने लोकांच्या आयुष्यात खोलवर बदल घडवला आहे. आता दोन व्यक्तीसुद्धा एकमेकांबरोबर राहू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कोणालाही सामावून न घेण्याची वृत्ती टोकाची झाल्याने एकटेपणा ही आजच्या जगातली सर्वांत मोठी समस्या आहे.

समाज जसजसा शिक्षित होतो आहे, तशीतशी माणसामधील सामावून घेण्याची वृत्ती नाहीशी होत आहे. एकमेकांना देण्याची, वाटून घेण्याची ताकद शिक्षणामुळे नाहीशी झाली आहे. सर्वांना सामावून घेणे हे अध्यात्माचे मूलभूत तत्त्व आहे, वेगळं होणं नाही. सर्वसमाविष्ट असणे म्हणजेच जीवन. वेगळं होणे म्हणजे मृत्यू.

सध्या शिक्षणाचा उपयोग फक्त उपजीविका मिळवण्यासाठी केला जात आहे. शिक्षणाचा उपयोग तुमच्या कक्षा रुंदावण्यासाठी केला जावा. लोक सतत स्वतःच्या आर्थिक स्तराच्या काळजीने इतके काही पछाडलेले असतात की त्यांनी शिक्षणाला पैसे मिळवण्याचे साधन बनवले आहे. हे बदलले पाहिजे.

जिप्सी लोकांबद्दल एक किस्सा सांगितला जातो. जिप्सी लोक पूर्णपणे वेगळ्याच प्रकारचे आयुष्य जगतात, जे उत्कट आणि वेगळ्याच दृष्टीने सुंदर असते. एकदा एक जिप्सी माणूस स्वतःच्या मुलाला रागावत होता, ‘‘काही कामाचा नाहीस तू. तू जर पैसे कमावण्याकरता जादू आणि हातचलाखी सारख्या गोष्टी शिकला नाहीस तर मी तुला शाळेत घालेन आणि तुला सुशिक्षित बनवेन, मग तू न संपणाऱ्या इच्छांमुळे दु:खी होशील.’’ दुर्दैवाने शिक्षणामुळे लोकांची ही अवस्था झाली आहे - न संपणाऱ्या इच्छा.

दुर्दैवाने शिक्षणाचा हा असा परिणाम झाला आहे. जे शिकवले जात आहे, त्यात काही चूक नाही; पण ते ज्या पद्धतीने शिकवले जात आहे ते निश्चितच चुकीचे आहे. माहिती मिळवण्याने लोकांचे नुकसान होत नाही, पण माहिती ज्या पद्धतीने गोळा केली जाते, पुरवली जाते आणि कोणत्या संदर्भाने ती दिली जाते त्याने लोकांचे नुकसान होत आहे. एखाद्याने त्याची बुद्धी अनावश्यक गोष्टींनी भरून टाकली नाही, तर ती व्यक्ती कुठेही गेली तरी तरुन जाईल. त्या व्यक्तीला नरकात पाठवले तरी ती व्यक्ती हळूहळू नरकाचाही स्वर्ग बनवेल. मुलांची वाढ अशा पद्धतीने व्हायला हवी. आपल्याला फक्त उत्तम, प्रेमळ व्यक्तीच नाही, तर त्याचबरोबर अगदी कणखर मनुष्यही बनवायची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: २ कोटींची सुपारी, आरोपींसोबत धनंजय मुंडेंचा संवाद...; मनोज जरांगेंनी थेट पुराव्याच्या ऑडिओ क्लिप ऐकवल्या

Thane News: 27 गावं तरी स्वतंत्र नगर परिषद नाही, आमदार-खासदार आक्रमक; कल्याण शीळ रोडवर सर्वपक्षीय आंदोलन

Latest Marathi News Live Update : जकार्तामधील मशिदीत स्फोट; 50 हुन अधिकजण जखमी

Mumbai Happiest City: कधीच न झोपणारी मुंबई ठरली ‘हॅप्पिएस्ट सिटी’! आनंदी शहरांच्या यादीत मिळाला पाचवा क्रमांक

Dhananjay Munde: राज्यातल्या बड्या नेत्यांच्या गाड्यांमध्ये धनंजय मुंडेंनी मोबाईल लपवले? आरोपांवर स्वतःच दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT