sadguru sakal
आरोग्य

इनर इंजिनिअरिंग : सर्वोत्तम आहे त्याला बाहेर आणा

प्रत्येक मानवी अनुभव, चांगला किंवा वाईट, आपल्या आतच उत्पन्न होतो. आपल्या आत होतं ते आपल्याला हवं तसंच झालं पाहिजे.

सद्गुरू, ईशा फाउंडेशन

प्रत्येक मानवी अनुभव, चांगला किंवा वाईट, आपल्या आतच उत्पन्न होतो. आपल्या आत होतं ते आपल्याला हवं तसंच झालं पाहिजे.

प्रत्येक मानवी अनुभव, चांगला किंवा वाईट, आपल्या आतच उत्पन्न होतो. आपल्या आत होतं ते आपल्याला हवं तसंच झालं पाहिजे. आपल्या आसपास जे काही होतं म्हणजे कौटुंबिक, व्यावसायिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती १०० टक्के आपल्याला हव्या तशी कधीच घडत नाहीत. कारण खूप साऱ्या शक्तींचा त्यात सहभाग असतो. आपल्याला जशा हव्या आहेत, त्याच्या जवळपास आपण गोष्टी नेऊ शकतो, परंतु पूर्णपणे आपल्याला हवं तसं होत नाही. सध्या, आपल्या बाहेरची परिस्थिती आपल्याला हवी तशी नसेल, तर आपल्या आतली स्थिती पूर्णपणे आपल्याला हवी तशी करायची हीच वेळ नाही का?

अनेक लोकांचा युक्तिवाद असा असतो की बाहेरची परिस्थिती बिघडते, तेव्हा तेसुद्धा स्वतःच्या विरोधात जातात. ते त्याला चिंता, भीती किंवा गोंधळ म्हणतात. भीती म्हणजे भविष्यात दुःख होईल या अपेक्षेने आत्ताच स्वतःलाच त्रास करून घेणे, असे दुःख जे कदाचित तुमच्या वाट्याला येणारही नाही. तुम्हाला हे माहीतसुद्धा नाही की ते येणार आहे की नाही. मूळात, तुमची कल्पनाशक्ती सुसाट सुटली आहे आणि तुमची बुद्धी तुमच्या विरोधात गेली आहे. अशा वेळेस, तुम्ही स्वतःसाठी अडथळा बनू नका. परिस्थिती तुमच्याकडून सर्वोत्तम गोष्टीची अपेक्षा करत आहे. तुम्हाला तुमच्या संपूर्ण बुद्धिमत्तेची, क्षमतेची आणि अनुभवाची गरज आहे.

तुम्ही काय विचार करता, काय वाटतं आणि काय कृती करता, यावर लाखो लोकांचं जीवन घडतं किंवा बिघडतं. तुमच्या हातात अशा प्रकारची शक्ती असते, तेव्हा तुमच्या मानसिक नात्याला तुम्ही सध्याच्या वास्तविकतेपेक्षा जास्त महत्त्वाचे होऊ देता कामा नाही. जगात तुम्ही किती उत्तमपणे कार्य करू शकता हे जास्त करून तुम्ही तुमच्या आत किती संतुलित आहात यावर अवलंबून असते. हे संतुलन आणण्यासाठी बऱ्याच साधना आहेत, ज्याने तुम्ही तुमचं शरीर, विचार आणि भावना तुमच्या नियंत्रणात ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच म्हणाले...

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT