Sadhguru Eating Tips esakal
आरोग्य

Sadhguru Eating Tips : भारतीय परंपरेतच आहे आरोग्याचा खजिना; जेवणातून पूर्ण पोषण मिळण्यासाठी सद्गुरुंनी दिल्या खास टिप्स

जेवण तर जेवतो पण पोषण मिळते का? ते कसे मिळवावे सांगतात सद्गुरू

धनश्री भावसार-बगाडे

How To Eat Your Meal In A Way To Get Maximum Benefits Tips By Sadhguru :

बऱ्याचदा आपण पूर्ण जेवण व्यवस्थित जेवत असलो तरी त्यातून पूर्ण पोषण मिळतेच असे नाही. मग अशक्तपणा, कमी रोग प्रतिकारक शक्ती आणि पर्यायाने येणारे सततचे आजारपण असे चक्र सुरू होते. पण काही नियम पाळलेत तर आपण अन्नातून जास्तीत जास्त पोषण मिळवू शकतो अशा काही टिप्स अध्यात्मिक गुरु सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी दिल्या आहेत. जाणून घेऊया.

भारतीय संस्कृतीत सांगितलेल्या पारंपरिक जेवणाच्या पद्धतीतच या पोषणाचे रहस्य दडले आहे. पण आपण पाश्चात्यांचे अनुकरण करताना आपल्याच चांगल्या गोष्टी विसरत जात आहेत. जर पुन्हा आपण आपल्या मुळाकडे वळलो तर आपल्याला पुर्ण पोषण मिळू शकेल.

जाणून घेऊया टिप्स

फक्त पोट भरण्यासाठी खाऊ नका

फक्त पोट भरण्यासाठी जेऊ नका. जे खात आहात त्या प्रत्येक पदार्थाकडे, घटकाकडे, चवीकडे लक्ष देऊन खा.

मनापासून जेवा

जेवणे हे केवळ भूक क्षमविण्याचे माध्यम नसून ते मनापासून जेवणे आवश्यक आहे. समोर आलेल्या अन्नाविषयी स्वीकृती आणि कृतज्ञतेने त्याचा स्वीकार करा.

जेवण्याची पद्धत

जेवताना कसे बसतात हे सुद्धा फार महत्वाचे आहे. त्यामुळे योग्य पद्धतीने जेवायला बसणे आवश्यक आहे.

जमिनीवर बसावे

जमीनीवर मांडी घालून बसावे आणि मग जेवावे. हे पचन क्रियेसाठी महत्वाचे आहे.

हाताने जेवण करा

जेवणासाठी चमच्यांचा वापर करू नये. त्याऐवजी हाताने जेवावे हे आरोग्यासाठी अधिक महत्वाचे आहे.

नीट चावून खा

आपले जेवण प्रत्येक घास नीट चावून खावा. प्रत्येक घास २४ वेळा चावावा असे सद्गुरु सांगतात.

फक्त जेवणाकडे लक्ष द्या

जेवताना बोलू नका किंवा गप्पागोष्टी करू नका. लक्षपूर्वक खाल्ल्याने शरीराला अन्नातून ऊर्जा मिळण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT