sanjay watve health doctor treatment mental illness esakal
आरोग्य

‘मायटीमॅन’

अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर पती-पत्नी त्यांची मुलगी नयनताराला घेऊन माझ्याकडे आले. तिला सुमारे १७ -१८ वर्षं मानसिक आजार होता.

सकाळ वृत्तसेवा

अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर पती-पत्नी त्यांची मुलगी नयनताराला घेऊन माझ्याकडे आले. तिला सुमारे १७ -१८ वर्षं मानसिक आजार होता.

- डॉ. संजय वाटवे

अकोल्याचे प्रसिद्ध डॉक्टर पती-पत्नी त्यांची मुलगी नयनताराला घेऊन माझ्याकडे आले. तिला सुमारे १७ -१८ वर्षं मानसिक आजार होता. अकोला, अमरावती, नागपूर, सगळे डॉक्टर्स पालथे घातले होते. नयनतारा चाळीशीला पोहोचली होती;

पण केस पिकलेले, चालताना पोक, हालचाली मंद, चेहऱ्यावरची रया गेलेली, डोळे निस्तेज. ड्रेसही चुरगळलेला. संभाषणात रस नव्हता. प्रश्नांची उत्तरे उशिरानी आणि मोजक्या शब्दात द्यायची. आवाज नीरस, बोलणं तुटक. आमच संभाषण लवकरच संपलं. तितक्याच निरीच्छेनं ती बाहेर गेली.

तिच्या डॉक्टर आई-वडिलांकडून हिस्ट्री घेणं अवघड होतं. दर दोन-तीन प्रश्नांनंतर ‘आमचं पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे. आमच्याकडे पाच-सहा डॉक्टर कामाला आहेत,’ हे ऐकायला मिळत होतं. सतरा-अठरा वर्षं बऱ्या न झालेल्या केसबद्दल बगल देत होते. गेली दहा-पंधरा वर्षं आम्ही याचा खूप अभ्यास करतोय, हे सांगत होते. जोडप्याचं तोंड वाकडे करणारा माझा पहिला बॉंबगोळा - ‘वाचून अभ्यास करून केस ट्रीट करता येत नाही. अर्हता आणि अनुभव लागतो.’

नयनताराला निश्चितच स्किझोफ्रेनिया झाला होता. कित्येक वर्षं त्याकडे दुर्लक्ष. कारण ‘आामचं पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे!’ केस गळ्याशी आल्यानंतर एक्स्पर्टकडून उपचार. थोडा फरक दिसल्यावर उपचार बंद. हळूहळू सगळी लक्षणं हजर.

पुन्हा दुर्लक्ष. डॉक्टरना दोष देणं. दुसरे डॉक्टर. पुन्हा तेच. मग तिसरे- चौथे. नंतर गाव बदलून डॉक्टर्स. करता करता केस क्रॉनिक झाली. मग नागपूर. त्यांनी गोळ्यांचा गुण येत नाही म्हणून इंजेक्शन सुचवलं, मग गुगल पारायण. इंजेक्शनला विरोध. ट्रीटमेंट बंद.

या सगळ्या प्रवासात तिचा थोडा बरा पिरीअड असताना श्रीराम नागपुरे यांच्याशी विवाह लावून देण्यात आला. मेडिकल हिस्ट्री लपवून. नागपुरे फार मोठी असामी! कापूस उत्पादक तर होतेच, कापूस खरेदी-विक्री, निर्यात हे पण होतं. दूधसंघाचे अध्यक्ष, सूत कारखान्याचे चेअरमन, साखर कारखान्यात डायरेक्टर बोर्डावर. सहकारी बँकेत सल्लागार असा बराच पसारा होता.

मी डॉक्टर जोडीला सांगितलं, ‘‘ज्या त्या डॉक्टरला दोष देऊन विंडो शॉपिंग करत बसू नका. कुठल्या तरी एका डॉक्टरवर विश्वास ठेवा. त्यांच्या पद्धतीनं उपचार घ्या. त्यांची ट्रीटमेंट पूर्ण करा. मगच गुणाची अपेक्षा बाळगा.’’

ते कुत्सितपणे हसले आणि म्हणाले, ‘‘आम्ही पूर्ण करू हो; पण तुमचं शास्त्रच अपूर्ण आहे.’’ मी म्हणालो, ‘‘केस क्रॉनिक झालेलीच आहे. तुम्हाला आता फार चॉईस नाही.’’ ते म्हणाले, ‘‘जावयाला विचारतो.’’

नागपुरे विमानानं माझ्याकडे आले. दोन पीए वर्दी द्यायला आधीच आले होते. नागपुरे उंचेपुरे, नाकेले, गोरेपान, धारदार बोलके डोळे, मोठे कपाळ. गोड हसून व किंचित वाकून नमस्कार केला. शरीर भरदार. आवाज भारदस्त. बोलताना समोरच्याला आपलसं करण्याची हातोटी. कुठेही नाटकीपणा, खोटेपणा नाही.

विचारही उत्तुंग. त्यांनी विचारलं, ‘‘हा जांगडगुत्ता काऊन बरा होऊन नाही राहिला? क्रॉनिक म्हणजे काय? आणि ते कशामुळं झालं?’’ मी म्हणालो, ‘‘बरी न होणारी जुनाट केस. ती तुमच्या सासू-सासऱ्यांच्या लुडबुडीमुळे झाली.’’ ते म्हणाले, ‘‘काही आशा आहेत का पूर्ण बरी होण्याच्या?’’ मी विविध शक्यता सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘म्हणजे आमच्या संसाराचा बेंगापात झाला की!’’

सासू सासऱ्यांवर राग नाही. संसारसुख मिळालं नाही याचा खेद, खंत नाही. ते म्हणाले, ‘‘सार्वजनिक जीवनात आमच्या अवतीभवती स्त्रिया घोटाळत असतात; पण मी रामभक्त आहे. संसाराच्या मर्यादा जाणणारा आहे. तिचा कायम प्रेमानी सांभाळ करणार. तिला सोडण्याचा विचार क्षुद्र, नीच असेल.’’

मला असे अनेक क्षुद्र, नीच पुरुष आठवले. मी म्हणालो, ‘‘तुम्हाला त्यांच्याकडून काहीच मिळत नाही. तर तुमचे विचार इतके उच्च कसे?’’ त्यावर ते गडगडाटी हसले. ते म्हणाले, ‘‘आय एम ए मायटी मॅन! देवानं मला शक्तिमान केलं आहे. ते असे चॅलेंजेज घेण्यासाठीच. देवानी मला सर्व काही देऊन हा चॅलेंज दिला आहे आणि मी तो घेतलाय.’’ मी अचंबित होऊन ऐकत राहिलो.

माझा देशाभिमान पुन्हा उफाळला होता. उच्च विचारसरणी, थोर संस्कृती, महान विवाहसंस्था ही कारणं होतीच. आपल्याकडे अजूनही मर्यादा पुरुषोत्तम आहेत म्हणून. जगातला सर्वांत प्रगत संपन्न देश अमेरिकेला मानलं जातं. त्यांच्याकडे ‘बॅटमॅन’ आहे, ‘स्पायडरमॅन’ आहे, ‘सुपरमॅन’ आहे, तर आमच्याकडे ‘मायटीमॅन’ आहे!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT