Shefali Jariwala Illness| Shefali Jariwala Epilepsy sakal
आरोग्य

Shefali Jariwala Illness: शेफाली जारीवाला तब्बल १५ वर्ष कोणत्या आजाराशी लढत होती? जाणून घ्या लक्षणं, कारणं अन् महत्त्वाची माहिती एकाच क्लिकवर

What illness did Shefali Jariwala suffer from for 15 years: शेफाली जरीवाला तब्बल १५ वर्षे मिरगीशी लढत होती; जाणून घ्या या आजाराची लक्षणं आणि कारणं एका क्लिकवर.

Anushka Tapshalkar

थोडक्यात:

  1. शेफाली जरीवाला तब्बल १५ वर्षे एपिलेप्सी (मिरगी) या आजाराशी झुंज देत होती, ज्यामुळे तिचं करिअर मर्यादित राहिलं.

  2. एपिलेप्सी ही मेंदूतील विद्युत गडबडीमुळे होणारी समस्या असून, यामध्ये व्यक्तीला वारंवार झटके येतात.

  3. या आजाराची कारणं अनुवंशिकता, मेंदूला इजा, संसर्ग, जीवनशैली आणि काही वेळा अज्ञात असू शकतात.

Symptoms and Causes of Epilepsy in Adults: ‘कांटा लगा’ आणि ‘बिग बॉस’मुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा २७ जून रोजी रात्री अचानक मृत्यू झाला. कमी रक्तदाब आणि त्यातून आलेल्या हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तिच्या अचानक जाण्याने चाहत्यांना आणि मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

मात्र तिच्या मृत्यूनंतर २०२१ मधील एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत आली आहे. या मुलाखतीत शेफालीने तिच्या आरोग्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला होता. ती लहानपणापासून एका गंभीर आजाराशी लढत होती. हाच आजार तिच्या करिअरमधील मोठा अडथळा ठरला होता.

काय सांगितलं होतं शेफालीने?

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती,
"जेव्हा मी 'कांटा लागा' केलं, तेव्हा अनेकांनी विचारलं की मी जास्त काम का केलं नाही. आज मी सांगू शकते की त्यावेळी मला एपिलेप्सीचे झटके यायचे , त्यामुळे मला फारसं काम करता आलं नाही. झटका कधी येईल, हे सांगता येत नसायचं... हे सगळं जवळपास 15 वर्षं चालू होतं. पण आता मला 9 वर्षांपासून एकही झटका आलेला नाही. मला अभिमान आहे की मी औषधांशिवाय, फक्त माझ्या मानसिक ताकदीने आणि माझ्या जवळच्या माणसांच्या आधाराने हे सगळं पार केलं."

या मुलाखतीनंतर, अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की, नेमकी एपिलेप्सी म्हणजे काय? आणि याची लक्षणे कशी ओळखावी? तर चला सविस्तर जाणून घेऊया या आजाराबद्दल.

एपिलेप्सी म्हणजे काय?

एपिलेप्सी (मराठीत मिरगी) हा मेंदूशी संबंधित एक आजार आहे. यात व्यक्तीला वारंवार झटके येतात. या झटक्यांवेळी मेंदूमधील विद्युत प्रवाह अनियमित होतो आणि त्याचा परिणाम शरीर, भावना, शुद्धी आणि वागणुकीवर होतो.

झटका कधीही, कुठेही, कोणत्याही परिस्थितीत येऊ शकतो. त्यामुळे रुग्णाच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होतो.

एपिलेप्सीची लक्षणं कोणती?

झटके हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही सामान्य लक्षणं अशी असतात:

  • अचानक शरीर कडक किंवा अगदी सैलसर होणे

  • अचानक खाली पडणे

  • हात-पाय झटकणे किंवा थरथरणे

  • अनपेक्षित लघवी होणे

  • आजूबाजूचे काही न कळणे, शून्यात बघत राहणे

  • विचित्र संवेदना जसेकी विचित्र वास, चक्कर, थंडी वाजणे, अचानक भीती वाटणे

  • विचित्र वर्तन जसेकी सारखे हलणे, चालत राहणे पण स्वतःला काहीच कळत नाही

हे झटके काही सेकंद ते काही मिनिटांपर्यंत चालू शकतात आणि नंतर थांबतात. काही लोकांना झटका आल्याचे आठवते, तर काहींना काहीच लक्षात राहत नाही.

एपिलेप्सी का होते?

एपिलेप्सी म्हणजे मेंदूतील विजेच्या गडबडीमुळे येणारे वारंवार झटके. याची कारणं वेगवेगळी असू शकतात:

  • अनुवंशिक कारणं: काही लोकांना झटके येण्याची प्रवृत्ती जन्मतःच असते.

  • मेंदूला इजा: डोके फोडणे, स्ट्रोक, मेंदूत गाठ, किंवा जन्मावेळी मेंदूला इजा झाल्यास एपिलेप्सी होऊ शकते.

  • संसर्ग: Meningitis, Encephalitis यांसारख्या मेंदूच्या संसर्गांमुळे झटके येऊ शकतात.

  • मेंदूची रचना चुकीची असणे: जन्मतः मेंदू नीट विकसित न होणे किंवा रक्तवाहिन्यांतील दोष.

  • इतर आजार: मधुमेह, किडनी विकार, डिमेन्शिया किंवा ऑटोइम्यून आजार.

  • जीवनशैली: झोपेचा अभाव, ताणतणाव, दारू किंवा ड्रग्स यांचा अतिवापर.

  • माहित नसलेली कारणं: काही वेळा झटक्यांचं कारण सापडत नाही.

कोणत्या वयात होऊ शकते?

एपिलेप्सीची सुरुवात लहान मुलांमध्ये किंवा ५० वर्षांवरील लोकांमध्ये जास्त होते, पण ती कोणत्याही वयात होऊ शकते.

टिप

एपिलेप्सी चे झटके हे फिव्हर मुळे येणाऱ्या झटक्यांपेक्षा वेगळे असतात. लहान मुलांना ताप आल्यावर जे झटके येतात, त्यांना फेब्राईल सीझर म्हणतात, आणि ते एपिलेप्सीचे झटके नसतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

FAQs

  1. एपिलेप्सी म्हणजे काय?

    एपिलेप्सी म्हणजे मेंदूतील विद्युत प्रवाहातील गडबडीमुळे वारंवार झटके येणारा दीर्घकालीन आजार आहे.

  2. एपिलेप्सीचे झटके कसे ओळखायचे?
    झटका आल्यावर शरीर कडक होणे, थरथर, अनाहूत लघवी, शुद्ध हरपणे, अजीब संवेदना किंवा वर्तन दिसून येते.

  3. एपिलेप्सी कशामुळे होते?

    अनुवंशिकता, मेंदूला इजा, संसर्ग, मानसिक ताण, झोपेचा अभाव किंवा काही वेळा अज्ञात कारणांमुळे एपिलेप्सी होऊ शकते.

  4. एपिलेप्सीवर उपचार शक्य आहेत का?

    हो, योग्य औषधोपचार, जीवनशैलीतील बदल आणि काही केसेसमध्ये शस्त्रक्रियेने एपिलेप्सी नियंत्रणात ठेवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT