Monkeypox, Covid-19 and HIV Esakal
आरोग्य

Shocking case: एकाच माणसाला एकाच वेळी मंकीपॉक्स, कोविड-19 आणि HIV ची लागण

कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांमुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.

सकाळ डिजिटल टीम

इटलीमध्ये एक दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये एकाच वेळी एका व्यक्तीचे मंकीपॉक्स, कोविड-19 आणि एचआयव्हीचे संक्रमण झाल्याचा अहवाल समोर आला. डॉक्टरांच्या मते, ही एक अतिशय दुर्मिळ केस आहे जी पहिल्यांदाच समोर आली आहे. मात्र, त्या व्यक्तीचा मंकीपॉक्स आणि कोविड-19 चा अहवाल आता निगेटिव्ह आला आहे.

कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांमुळे जगभरातील आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. या संदर्भात वेळोवेळी आरोग्य विषयक सूचना जारी केल्या जात आहेत. निरीक्षण केले जात आहे आणि चाचण्याही सुरुच आहेत. त्याचबरोबर या आजारांपासून दूर राहण्यासाठी लोक खबरदारीही घेत आहेत. नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे जे जगातील एकमेव आहे. या प्रकरणात एक व्यक्ती कोविड-19, मंकीपॉक्स आणि एचआयव्हीने ग्रस्त आहे. हे अनोखे प्रकरण समोर आल्यानंतर शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इटलीचे आहे. खरं तर, इटलीमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय व्यक्तीचे कोविड-19 मंकीपॉक्स आणि एचआयव्हीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. परंतु, असे सांगण्यात आले आहे की लक्षणे दिसण्यापूर्वी रुग्ण पाच दिवसांसाठी बाहेर गेला होता. या इटालियन व्यक्तीचे प्रकरण जर्नल ऑफ इन्फेक्शनमध्ये प्रकाशित झाले होते.

● तब्बल नऊ दिवसांनी लक्षणे दिसायला सुरुवात होते.

जर्नल ऑफ इन्फेक्शननुसार, संक्रमित व्यक्तीला प्रवासातून आल्यानंतर 9 दिवसांनी लक्षणे दिसू लागली. ताप, घसा खवखवणे, थकवा, डोकेदुखी आणि कंबरेभोवती सूज येणे ही लक्षणे आहेत. ही लक्षणे कोविड-19 च्या लक्षणांसारखी होती. जेव्हा त्या व्यक्तीची कोविड चाचणी झाली तेव्हा त्याचा अहवाल कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला. त्या व्यक्तीला Omicron च्या BA.5.1 उप-प्रकार कोरोनाची लागण झाली होती आणि फायझरच्या MRNA लसीच्या दोन डोससह कोरोनाव्हायरस संदर्भातील लसीकरण करण्यात आले होते.

● अंगावर फोड आणि पुरळ येणे.

अहवालात असे म्हटले आहे की, कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या त्वचेवर चेहऱ्यावर आणि इतर भागांवर पुरळ उठले होते ज्याने फोडांचे रूप धारण केले होते. जेव्हा परिस्थिती बिघडली, जेव्हा ती व्यक्ती हॉस्पिटलच्या आपत्कालीन निगराणी खाली गेली तेव्हा त्याला संक्रमण रोग युनिटमध्ये पाठवले गेले. तेथे डॉक्टरांना त्याच्या शरीराच्या अनेक भागांवर डाग आणि जखमा असल्याचे दिसले. यानंतर त्या व्यक्तीच्या काही चाचण्या करण्यात आल्या आणि त्यांचा मंकीपॉक्स आणि एचआयव्हीचा अहवालही पॉझिटिव्ह आला.त्या व्यक्तीला जवळपास आठवडाभर अॅडमिट ठेवल्यानंतर त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

मंकीपॉक्स आणि कोविड-19 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

ही व्यक्ती कोविड-19 आणि मंकीपॉक्सपासून बरी झाली आहे आणि त्याच्या एचआयव्ही संसर्गावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. संशोधकांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, ” या प्रकरणातून असे निदर्शनास येते की मंकीपॉक्स आणि कोविड-19 ची लक्षणे कशी ओव्हरलॅप होऊ शकतात? हे पुष्टी करते की सह-संसर्गाच्या बाबतीत अॅनेमनेस्टिक संग्रह आणि लैंगिक सवयी खऱ्या आहेत.” उपचार कसे करावे हे महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, मंकीपॉक्स ऑरोफॅरिंजियल स्वॅब्स 20 दिवसांनंतरही सकारात्मक आहेत, जे सूचित करतात की ती व्यक्ती नकारात्मक असली तरीही अनेक दिवस संसर्गजन्य असू शकते. कोविड-19 आणि एचआयव्ही सह-संसर्गाची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत असे सूचित करणारा कोणताही पुरावा नाही. की या तीन गोष्टी माणसाची स्थिती बिघडू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

SCROLL FOR NEXT