Care In Fever esakal
आरोग्य

Care In Fever : ताप आला की अंघोळ करायला हवी का?

तापात आंघोळ करावी की नाही याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

सकाळ ऑनलाईन टीम

Care In Fever : सध्याचे हवामान कधी बदलेल हे सांगता येत नाही. शहरात सध्या डेंगी सदृश ताप, सर्दी, खोकला अशी डेंगी सदृश आजारांची साथ पसरली आहे. लोक ताप आल्यानंतर स्वतःची काळजी घेतात, डॉक्टरांकडे जातात किंवा मेडिकल स्टोअर्स मध्ये जाऊन औषधे घेतात, या सर्व गोष्टी ते करतातच. मात्र तापात आंघोळ करावी की नाही याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

मात्र या पलीकडेही काही लोक डॉक्टरांना तापात अंघोळ करणे चांगले की वाईट? असा प्रश्न बहुतेक लोकांना पडला असेल, मात्र ताप आल्यानंतरही कोमट पाणी करून त्यामध्ये कापड भिजवून आपले शरीर स्वच्छ केले पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. काही लोक अंघोळ करतात तर काही लोक अंघोळ करत नाही. तर तापात अंघोळ करू नये असं बहुतेक लोकांचं म्हणणं आहे. पण तापात अंघोळ कशी करावी किंवा आपली स्वतःची निगा कशी राखावी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.

ताप आल्यानंतर हे करा....

कोमट पाणी करून त्यामध्ये कापड भिजवून शरीर स्वच्छ करावे

आपल्या शरीराची स्वच्छता होते

मानसिक दृष्ट्या देखील आपल्याला बरे वाटते.

ताप आल्यानंतर गरम पाणी प्यावे

वाफ, आल्याचा चहा घेतल्यास आराम वाटतो (Health)

ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते त्यांच्यामध्ये हा व्हायरल ताप झपाट्याने वाढतो. व्हायरल ताप लहान मुले, वृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांच्यामध्ये हा संसर्गजन्य ताप पुन्हा येण्याची शक्यता असते.

-डॉ. एम.एम. बोरकर, निवृत्त वैद्यकीय अधिकारी, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेल्वे गाड्यांना उशीर, परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक; रेल्वेची तोडफोड, IGसह पोलीस जखमी

IND vs AFG: थांबा आईचा कॉल येतोय... नितीश रेड्डीचा पत्रकार परिषद सुरू असतानाच वाजला फोन अन् मग...; पाहा Video

Gurupushyamrit Yoga Significance : गुरुपुष्यामृत योगातून त्रिवेणी संगमाच्या आध्यात्मिक अर्थाचा उलगडा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 जून 2026

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ जून २०२६ ते २० जून २०२६)

SCROLL FOR NEXT