Shravan month fasting tips for better health sakal
आरोग्य

Shravan Upvas Benefits: या श्रावणात ‘उपवास’ ठरेल आरोग्यासाठी वरदान! कारणे, फायदे व महत्त्व समजून घ्या

Health and Spiritual Benefits of Shravan Upvas: श्रावण महिन्यात उपवास केल्याने शरीर शुद्ध होते, पचन सुधारते आणि आध्यात्मिक प्रगती होते.

सकाळ वृत्तसेवा

थोडक्यात:

  1. श्रावण महिन्यात उपवास केल्याने पचनशक्ती सुधारते व पोटाच्या समस्या टाळता येतात.

  2. उपवासामुळे त्वचा चमकते, वजन नियंत्रणात राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

  3. श्रावणातील उपवासाचे धार्मिक, आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.

श्रावणामध्ये उपवास का करावा?

श्रावणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. हे पाणी रस्त्यावरून वाहत जलसाठ्यांमध्ये मिसळते. रस्त्यावरील घाणही सोबत असते. त्यामुळे जलसाठे दूषित होतात. परिणामी, अनेक आजार बळावतात. पोटाच्या बऱ्याच समस्या उद्भवतात.

श्रावणात उपवास केल्याने रोजच्यापेक्षा या महिन्यात पचनशक्ती सुधारते, पालेभाज्यांचा समावेश केला जात नाही. श्रावणात उपवास करण्याचे काय फायदे आहेत. कांदे, लसूण, वांगी या भाज्या वर्ज्य केल्या जातात.

आयुर्वेदानुसार जर श्रावण महिन्यात एक दिवसही उपवास केला, तर आरोग्याशी संबंधित समस्या येत नाहीत, असे केल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या टाळता येतात. पोटदुखी, गॅस, ॲसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो. उपवास केल्याने भूक चांगली लागते. वजन कमी होण्यास मदत होते. उपवासाच्या वेळी द्रव पदार्थांचे जास्त सेवन केले जाते. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते. तुमच्या रोजच्या आहाराचा थेट परिणाम हा त्वचेवर होतो.

सोबतच मसालेदार पदार्थ देखील खाल्ले जात नाहीत. यामुळे त्वचा चांगली राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपवास अत्यंत फायदेशीर मानला जातो. उपवासामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. चार महिने अनुष्ठान, यज्ञ, याग करताना उपवासाला वेगळे महत्त्व आहे.

उपवासाचे धार्मिक महत्त्व काय?

महादेव हे विरक्त आहेत, म्हणजेच त्यांना काहीही लागत नाही. देवाप्रमाणेच आपण विरक्त होऊन सेवा करणे म्हणजे आपण कुठलीही आशा न ठेवता, असे व्रत केल्याने देव लवकर प्रसन्न होतो. या भावनेतून उपवास करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. दुसरीकडे उन्हाळा संपून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे तेलकटसह इतर पदार्थ पचण्यास जड जातात. असे व्रत केल्याने शरीरातील घाण बाहेर पडून शुद्धी होते. हे उपवास करण्याचे शास्त्रीय कारण असल्याचे ज्योतिषाचार्य पवन जावळे यांनी सांगितले.

यंदा चार श्रावणी सोमवार

यावर्षी श्रावण महिन्यात चार सोमवार आलेले आहेत. श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पूजेसोबतच मंगळागौर जिवंतिका पूजन, नागोबाचे पूजन, राखी पौर्णिमा, कृष्णाष्टमी, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बैलपोळा हा सण आहे. आषाढापासून चतुर्मासाला प्रारंभ होतो. त्यानंतर सणांची मालिका सुरू होते.

श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजेसोबतच अनेक पूजा केल्या जातात. धार्मिक वातावरण निर्माण झालेले असते. पूजा करणारा सकाळपासून सायंकाळपर्यंत उपवास करतो. उपवास केल्यामुळे त्याला वेगळाच आनंद प्राप्त झालेला असतो. आध्यात्मिक प्रगती सोबतच मानसिक, शारीरिक वैचारिक प्रगती होते. त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराला रुद्राभिषेक, महामृत्युंजय पूजा केली जाते.

(सकाळ अर्काईव्हमधून)

FAQs

  1. श्रावणात उपवास का करावा? (Why should one fast during Shravan month?)
    श्रावण महिन्यात शरीराची पचनशक्ती कमी असते, त्यामुळे उपवास केल्याने शरीराची शुद्धी होते आणि आरोग्य सुधारते.

  2. श्रावणात उपवासाचे कोणते आरोग्यदायी फायदे आहेत? (What are the health benefits of fasting in Shravan?)

    उपवासामुळे पचन सुधारते, वजन कमी होते, त्वचा निरोगी राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

  3. उपवास करताना कोणते पदार्थ टाळावेत? (Which foods should be avoided during fasting?)
    कांदा, लसूण, वांगी, तेलकट व मसालेदार पदार्थ टाळावे; तसेच पालेभाज्यांचा वापरही कमी करावा.

  4. श्रावणातील उपवासाचे धार्मिक महत्त्व काय आहे? (What is the religious significance of fasting in Shravan?)
    हे महादेवाच्या भक्तीसाठी व विरक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Yadav Murder Caseराधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

Record Breaking : १० चौकार, १२ षटकार! ३५३ च्या स्ट्राईक रेटने शतक; ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भीमपराक्रम, २९ धावांत ९ गेल्या तरी संघ जिंकला

Latest Marathi News Updates : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमधील बडी काली मंदिराला दिली भेट

SCROLL FOR NEXT