Salt Side Effect  esakal
आरोग्य

Salt Side Effect : तुम्हीही वरून मीठ घेता काय? वेळीच थांबा, दुष्परिणाम वाचून बसेल धक्का

मीठाने जेवणाची चव वाढते यात काही वादच नाही. मात्र ते योग्य प्रमाणातच असायला हवं.

सकाळ ऑनलाईन टीम

Salt Side Effect : अन्नाची चव वाढवणारा जेवणातील महत्वपूर्ण पदार्थ म्हणजे मीठ. ते नसेल तर अन्न बेचव लागतं. कधी कधी जेवणात मीठ कमी झाले असेल तर बरेच लोक वरून मीठ घेतात. बरेचदा आई मुलांना सांगत असते की वरून मीठ घेऊ नकोस नाहीतर रक्ताचं पाणी होईल. त्यामागे काय कारण होतं बरं?

मीठाने जेवणाची चव वाढते यात काही वादच नाही. मात्र ते योग्य प्रमाणातच असायला हवं. मीठ अतिप्रमाणात आणि जेवणात वरून खाल्ल्यास त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.

जेवणात वरून मीठ घेतल्यास भोगावे लागतील हे दुष्परिणाम

रक्तदाब वाढण्याचा धोका

जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) धोका निर्माण होतो. रक्तदाबामुळे (High BP) अनेक आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी कमी होऊ शकते, हृदयवरील ताण वाढतो त्यामुळे हृदयविराकाराच झटका येण्याची भीती उद्भवते. 

लठ्ठपणा वाढू शकतो

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जेवणात जास्त मीठ खाल्ल्यामुळे लठ्ठपणाची समस्या होते. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं आणि तुमच्या शरीरातील चरबीही वाढते. (Breakfast)

किडनीवरही होऊ शकतात गंभीर परिणाम

जास्त मीठ खाल्ल्यामुळे सोडियम शरीरात जातं. त्यामुळे मूत्रपिंडाला सोडियम पचविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागते. याचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो. 

चेहरा आणि पायावर सूज येऊ शकते

तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ खाल्लामुळे पायावर आणि चेहऱ्यावर सूज येते. 

वारंवार लघवीला जाणे

जास्त मीठ खाल्ल्यामुळे अनेकांना वारंवार लघवीची समस्या जाणवते. UTI, टाइप 2 मधुमेह आणि अतिक्रियाशील मूत्राशय यासारख्या अनेक आजार हे जास्त मीठ खाल्ल्यामुळे होतात. (Health News)

सतत तहान लागणे

जास्त मीठ खाल्ल्याने तुम्हाला बहुतेक वेळा तहान (Water) लागते. कारण सोडियम हे तुमच्या शरीराचं संतुलन बिघडवतं. त्यामुळे तुम्हाला सतत पाणी प्यावसं वाटतं. (Dehydration)

मग दिवसभरात किती मीठ खावे? 

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं दिवसभरात किती मीठ खायला हवं. तर WHO च्या मते, आपण आपण दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा (Heart Attack, Heart Disease) धोका वाढतो. 'डब्ल्यूएचओ' कडून (World Health Organization) एक रिसर्च करण्यात आला ज्यानुसार लोक दररोज 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. तेव्हा मीठ नियंत्रणात खावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2025 Retention: मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना केले रिटेन, बाकीच्या 4 संघाचं काय? बघा कोणाकडे लिलावासाठी किती पैसे राहिले शिल्लक

CSMT Protest: रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन; मुंबई लोकलची सेवा विस्कळीत, ट्रेन तब्बल १ तास उशीराने, संपूर्ण प्रकरण काय?

Latest Marathi Live Update News : भायखळा दरम्यान काही महिला पडून अपघात

Eknath Shinde : चाकणला उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही; लाडकी बहिण योजना बंद होणार नाही!

Earn Lakhs Without Job : नोकरी न करताही तुम्ही मिळवू शकता लाखोंचं पॅकेज!, फक्त पास करा एक परीक्षा

SCROLL FOR NEXT