Snake Venom esakal
आरोग्य

Snake Venom : सापाच्या विषापासूनही होऊ शकते नशा? जाणून घ्या काय आहे हा प्रकार? आणि त्याचे दुष्परिणाम

नशा करण्यासाठी सापाचे विष वापरणे हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Snake Venom : जगभरात नशा करणाऱ्या पदार्थांचे आणि नशा करणाऱ्या लोकांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नशा करण्यासाठी जगभरातील अनेक जण  विविध प्रकारचे अंमली पदार्थ, अफू, निकोटीन आणि भांग सारख्या गोष्टींचे सेवन करतात.

परंतु, आता यामध्ये स्मोकिंग, इंजेक्शन किंवा सापाच्या विषाचीही भर पडली आहे. स्मोकिंग किंवा इंजेक्शनच्या मदतीने ड्रग्सची नशा केली जाते आता सापाच्या विषाचाही त्याच समावेश झाला आहे. होयं तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे.

सापाच्या विषाची नशा ही वेगवेगळ्या प्रकारची असल्याचे सांगितले जाते. कारण, प्रत्येक सापाचे विष हे वेगळ्या प्रकारचे असू शकते. परंतु, नशेमध्ये सापाचे विष सेवन करण्याचा कल जगभरात सातत्याने वाढत आहे, जे की धोक्याचे आहे.

मात्र, सापाचे विष किंवा सर्पदंश यामुळे खरच अंमली पदार्थांच्या व्यसनाची सवय लागू शकते का?  किंवा याचे बळी पडू शकतात का? हा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. चला तर मग जाणून घेऊयात, सापाच्या विषाचे व्यसन, लक्षणे आणि दुष्परिणाम जाणून घेऊयात.

सापाच्या विषापासून कशी केली जाते नशा ?

सापाच्या विषापासून खरच नशा केली जाऊ शकते का? आणि याची सवय लागू शकते का? तर याचे उत्तर हो असे आहे. सापाच्या विषामुळे तुम्हाला नशा होऊ शकते. साप चावल्यानंतर, त्याच्या लक्षणांमधून हे सूचित होते की, काही सापांचे विष हे न्यूरोटॉक्सिक असते.

ज्यामुळे, तो साप चावल्यानंतर आपल्याला वेदना जाणवू शकत नाहीत. त्यामुळे, अशा सापांपासून विष काढून त्यापासून नशा केली जाऊ शकते.

आता ही नशा करण्यासाठी सापाचे विष काढले जाते. त्यानंतर, या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी ते इतर घटकांमध्ये मिसळले जाते. जेणेकरून ते आपल्या शरीराला घातक ठरू नये. विशेष बाब म्हणजे अल्कोहोल आणि ड्रग्ज सारख्या इतर मादक पदार्थांपेक्षा हे सापाचे विष अधिक प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

जे लोक हे विष वापरतात किंवा या विषापासून नशा करतात त्यांना एक विचित्र प्रकारचा आनंद आणि हवेत असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. शिवाय ३-४ आठवडे त्यांना चांगली झोप येते यांसारखी लक्षणे दर्शवतात.

सापाच्या विषाचे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम

मूळात नशा करण्यासाठी सापाचे विष वापरणे हे अत्यंत धोकादायक आणि चुकीचे आहे. कारण, विष हे शेवटी विषच असते. सापाचे विष हे कोणतेही मनोरंजन करणारे औषध नाही किंवा नशा करणारे औषध नाही. साप त्याचे विष हे शिकार करण्यासाठी आणि जी शिकार केली जाते तिला मारण्यासाठी या विषाचा वापर करतो.

शिवाय, सापाच्या विषाचे सेवन केल्यावर त्यापासून येणारा मृत्यू रोखण्यासाठी कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे, या विषाचे सेवन करणाऱ्यांना अर्धांगवायूचा झटका आणि मृत्यूचा धोका वाढू शकतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT