Sprouted Wheat  esakal
आरोग्य

Sprouted Wheat : अंकुरित गहू खाण्याचे 3 जबरदस्त फायदे, एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा

अंकुरित गहू एकदातरी नक्के खाऊन बघावे. त्याचे अनेक फायदे आहेत.

साक्षी राऊत

Sprouted Wheat : गव्हाचा वापर जगभरात केला जातो, त्याच्या पिठापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. चपाती तर आपल्या रोजच्या जीवनाचा भाग आहे. आपल्यापैकी बहुतेकांना गव्हापासून तयार केलेली भाकरी आवडते. गव्हात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, परंतु तुम्ही कधी अंकुर आलेले गहु खाल्ले आहेत का? आपल्यापैकी बहुतेकांचे उत्तर 'नाही' असेल. मात्र अंकुरित गहू एकदातरी नक्के खाऊन बघावे. त्याचे अनेक फायदे आहेत.

अंकुरित गहू खाण्याचे फायदे

1. वेट कंट्रोल

वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे, वेस्टर्न कल्चरमुळे लोकांच्या शारीरिक हालचाली बर्‍याच प्रमाणात कमी झाल्या आहेत, त्यामुळे वजन वाढण्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. अशा वेळी तुम्ही अंकुरलेले गहू खाऊ शकता, त्यामुळे वजन नियंत्रणात राहाते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे हळू हळू वजन कमी होऊ लागले. (Health)

2. डायजेशन चांगलं होईल

ज्या लोकांना नेहमी पोटदुखीची तक्रार असते त्यांनी रोजच्या आहारात अंकुरलेल्या गव्हाचा समावेश करावा कारण त्यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, गॅस आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. (Wheat)

3. हाडे मजबूत होतील

वाढत्या वयाबरोबर हाडे पूर्वीसारखी मजबूत राहत नाहीत आणि नंतर हळूहळू शरीरात अशक्तपणा येऊ लागतो, यापासून बचाव करण्यासाठी सकाळी उठून अंकुरलेले गहू खावेत, कारण असे केल्याने हाडांना जबरदस्त ताकद मिळते, कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक पोषक तत्व अंकुरलेल्या गव्हात पूरेपूर असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

आजचे राशिभविष्य - 13 सप्टेंबर 2025

Weekend Breakfast Idea: वीकेंडला सकाळी नाश्त्यात झटपट बनवा दुधीभोपळ्याचे सँडविच, सोपी आहे रेसिपी

Nagpur Accident: खापा मार्गावर आयशरने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Crime: पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू; गुन्हा दाखल, कौटुंबिक वादातून अंबाजोगाई शहरातील घटना

SCROLL FOR NEXT