mind sakal
आरोग्य

चेतना तरंग : मनाच्या नियंत्रणासाठी

तुमचे स्वतःवर नियंत्रण आहे असे तुम्हाला वाटते? हा एक भ्रम आहे. तुमच्या नियंत्रणात काय आहे? तुमचे हृदय तुमच्या नियंत्रणात आहे? तुम्ही तुमचे विचार नियंत्रित करू शकता?

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

प्रश्न - मी नियंत्रणासाठी धैर्य कोठून आणू?

तुमचे स्वतःवर नियंत्रण आहे असे तुम्हाला वाटते? हा एक भ्रम आहे. तुमच्या नियंत्रणात काय आहे? तुमचे हृदय तुमच्या नियंत्रणात आहे? तुम्ही तुमचे विचार नियंत्रित करू शकता? तुमच्या सभोवतालचे वातावरण तर सोडाच, तुमच्या शरीरावर तरी तुमचा ताबा आहे का? तुम्ही याबाबत काहीही करू शकत नाही. तुमच्या नियंत्रणात काहीच नाही. नियंत्रण सोडून देण्याची भीती बाळगण्याची गरज नाही. तो एक आभास आहे.

मुल्ला नसिरुद्दीनची एक गोष्ट आहे. मुल्ला नसिरुद्दीनला एक स्वप्न पडले. कार विकत घेण्यासाठी सौदा करत असल्याचे त्याला दिसले. ‘मी तुला एक हजार नऊशे अठ्ठ्याणव डॉलर्स देईन’, मुल्ला म्हणाला. ‘नाही, नाही,’ गाडी विक्रेता उत्तरला. ‘मग मी तुला एक हजार नऊशे नव्व्याणव डॉलर्स देईन.’ ‘नाही, नाही,’ गाडी विक्रेता पुन्हा उत्तरला, ‘दोन हजार डॉलर्स ही माझी अंतिम किंमत आहे.’ किमतीची घासाघीस सुरूच होती, तेव्हा मुल्ला जागा झाला.

त्याला खूपच वाईट वाटले. तो म्हणाला, ‘किती चांगला सौदा होता.’ त्याने पुन्हा त्याचे डोळे बंद केले, ‘ठीक आहे. आता मी तुला दोन हजार डॉलर्स देईन. मला अजून एक डॉलर जास्त देण्यास काही हरकत दिसत नाही. तू मला कार दे. हा सौदा निपटून टाक.’ केवळ एक स्वप्नजगत. स्वप्नातसुद्धा मालकी हक्काची भावना आहेच, कारण ती आपल्या आत एकदम खोलवर रुतलेली आहे.

आपल्याला वाटते की आपण छताला उचलून धरले आहे. घटना आपोआप घडून येतात. हा विचार थोडा क्रांतिकारक आहे. यामुळे कदाचित तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न निर्माण होतील. तुमच्या जीवनाच्या संदर्भात या विधानाची संपूर्णपणे चाचणी करा. तुम्ही आता याक्षणी जिथे आहात, तिथेच असायला हवे म्हणून सगळ्या घटना अशा घडून आल्या. या संपूर्ण अभूतपूर्व जगात सगळे काही आपणहून घडून येत आहे. तुम्ही केवळ बघण्याचे काम करू शकता.

प्रश्न - तुम्ही म्हणता की आपण आपल्या जीवनाचे केवळ निरीक्षण केले पाहिजे, तेव्हा त्याचा अर्थ आपल्याला हवे असलेले आयुष्यात कधीही मिळणार नाही, असाच होतो का?

तो एक विचार आहे. तुम्हाला तुमच्या जीवनाची घडी विशिष्ट प्रकारे बसवायची आहे. म्हणून काही विचार उत्स्फूर्तपणे येतो आणि तुमच्या लक्षात येते की तो बरोबर आहे, तेव्हा तुम्ही त्यावर कृती करता. तो विचार येण्याआधी तुम्हाला तो कधीच कळणार नाही. तुम्हाला माहीत आहे, केवळ त्यावर तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला माहीत आहेच, तर त्यावर विचार करण्याची काय आवश्यकता आहे? विचार करीत बसण्याने चिंता निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress spokesperson assaulted Video : काँग्रेस प्रवक्त्यास पुण्यात मारहाण!, प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी ट्वीट केला घटनेचा व्हिडिओ

टी-२० विश्वचषक सामन्यावर सट्टेबाजी! स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली कठोर कारवाई

T20 WC, WI vs ZIM: ७ चौकार, ७ षटकार... वानखेडेवर हेटमायरचं वादळ; झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडपत विंडीजसाठी रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Virar News : मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट

SCROLL FOR NEXT