Beauty Sakal
आरोग्य

चेतना तरंग : सौंदर्याचा अर्थ

सौंदर्याचा खरा अर्थ मौनामध्ये उदय पावतो. आपण सर्व गोष्टींना कशी लेबले देतो. मग आपण विचार करतो, की आपण प्रेमळ व्यक्ती आहोत.

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

सौंदर्याचा खरा अर्थ मौनामध्ये उदय पावतो. आपण सर्व गोष्टींना कशी लेबले देतो. मग आपण विचार करतो, की आपण प्रेमळ व्यक्ती आहोत.

सौंदर्याचा खरा अर्थ मौनामध्ये उदय पावतो. आपण सर्व गोष्टींना कशी लेबले देतो. मग आपण विचार करतो, की आपण प्रेमळ व्यक्ती आहोत. अनेक लोकांना वाटते, की ते त्यांच्या प्रिय व्यक्तीवर प्रेम करतात, परंतु आतमध्ये काहीही होत नसते. सुरुवातीला वाटणारे प्रेम आता अचानक आटून गेले आहे. आपल्या आत असलेले जीवनाचे कारंजे जिवंत ठेवण्यासाठी काही अंतर राखा, स्वतःच्या आत खोल जा.

एक जर्मन मुलगा होता, ज्याचे कोणत्याही मैत्रिणीबरोबर जमायचे नाही. ही त्याची समस्या होती. तो मैत्री सहजपणे करीत असे आणि थोड्या दिवसांत ती तुटून जात असे. त्याला याचे कारण माहीत नव्हते. परंतु तो अतिशय बडबड्या होता, सतत अविरत बोलणे सुरूच असे. तो समोरच्या व्यक्तीला उत्तरसुद्धा देऊ द्यायचा नाही. तो लगेच पुढचा प्रश्न विचारत असे आणि पुन्हा त्याचे उत्तरपण तो स्वतःच देत असे. कोणालाही तो न आवडणे साहजिकच होते. तुम्हाला कानात कापसाचे बोळे घालून तरी बसले पाहिजे, नाहीतर मग पळून तरी गेले पाहिजे. लोकांच्या कानात बोळे घालण्याने त्याला काही फरक पडत नव्हता आणि त्याची कोणाकडून उत्तराची अपेक्षासुद्धा नव्हती. त्याला नुसते बोलायचे होते.

एकदा त्याला एका कार्यक्रमात एक इटालियन मुलगी भेटली. त्या इटालियन मुलीला जर्मन येत नव्हते आणि त्याला इटालियन येत नव्हते. तर या दोघांनी लग्न केले आणि अजूनसुद्धा एकत्र आहेत. मी त्यांना सांगितले, ‘ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही एकमेकांची भाषा शिकले नाहीत. तुम्ही जसे आहात तसेच चांगले आहात.’ त्याला काही सांगावयाचे असेल तर त्याला प्रत्येक शब्द शब्दकोषामध्ये शोधावा लागायचा आणि मग सांगता यायचे. या सर्वांकरिता बराच काळ लागायचा आणि त्यांना श्वास घेण्यास सवड तरी मिळायची.

आपण मौनाद्वारे फार चांगले संभाषण करू शकतो. आपण आपल्या हृदयांमार्फत चांगले संभाषण करू शकतो. हे खूपच गहिरे आहे. आपल्यामधील मौनामधील क्षेत्रामध्ये जगू शकलो नाही, तर आपल्या आयुष्यातील केवढ्या तरी सौंदर्याला मुकतो आहोत. रोज थोडा वेळ हातातले सगळे काम सोडून केवळ उभे राहून दहा मिनिटे आकाशाकडे पाहा. ताऱ्यांना पाहा.

गुलाबाची फुले पाहा. ‘हा गुलाब किती सुंदर आहे; हा मोठा आहे आणि हा अजून मोठा आहे,’ असे म्हणू नका. ते तिथे आहे, बस्स! ते सुंदर आहे. जीवन या सर्वांपेक्षा मोठे आहे!

सौंदर्य तुम्हाला देवाच्या दिशेने, कृतज्ञतेच्या दिशेने घेऊन जाते. तुम्ही काहीतरी सुंदर पाहिले आणि तुमच्यामध्ये कृतज्ञ भाव जागा झाला, म्हणजे तुम्ही शरणागत झाला आहात. प्रेमाचा बांध फुटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT