positive thinking sakal
आरोग्य

चेतना तरंग : सकारात्मक विचार

सकारात्मक विचार किंवा नकारात्मक विचार यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे.

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

प्रश्न - गुरुदेव, आमच्या कार्यात आम्हाला नकारात्मक विचार उद्‍भवतात असा अनुभव येतो. सकारात्मक विचार किंवा नकारात्मक विचार यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे, हो ना? मग आपण सकारात्मक विचारांचीच निवड केली पाहिजे ना? आता मला सांगा की विचार आधीच येऊन निघून गेले असतील, तर तुम्ही निवड कधी करीत बसणार. सकारात्मक विचार आला आणि निघून गेला. एक नकारात्मक विचार आला आणि गेला. काहीतरी निघून गेले आहे, तर ते गेल्यावर निवड करण्याला काहीच अर्थ नाही.

गुरूदेव - निवड हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे द्योतक आहे. मनातील विचार स्पष्ट असतात तेव्हा तुम्ही निवड करीत नाही. हे म्हणजे, ‘माझ्याकडे भिंतीमधून जाण्याचा किंवा दारातून जाण्याचा पर्याय आहे.’ असे म्हणणे झाले. माझे विचार स्पष्ट असतील तेव्हा मी म्हणेन, ‘नाही, मी दारातून जाईन.’ इथे काही पर्यायच नाही. म्हणून काही तरी जीवनासाठी उपयुक्त आहे असे तुमच्या लक्षात येईल तेव्हा ती गोष्ट आपोआप घडेल. ‘ठीक आहे, मी आनंदी असणे आणि उदास असणे यामध्ये निवड करेन.

मी प्रेमळ असणे आणि घृणास्पद असणे यात निवड करेन,’ असे आपण म्हणत नाही. म्हणतो का आपण असे? आपल्याला काही पर्याय आहे का? कोणाला घृणास्पद असणे आवडते का? हा एक आभास आहे. आपल्याला पर्याय आहे असा विचार करण्याने आपल्यावरील बंधन अधिक सशक्त होते. तुमच्या मनातील विचार स्पष्ट असतील तेव्हा जे काही जीवनरक्षक आहे, जे काही उत्क्रांतीकारक आहे त्याच्याच मार्गावर तुम्ही जाल. याबाबत अजिबात शंका नाही. तुम्ही गोंधळलेले असता, तेव्हा ज्याची तुम्ही निवड कराल ती चुकीचीच असेल, कारण तुम्ही गोंधळलेले असता.

इच्छाशक्ती आणि प्राक्तन यांना काय म्हणायचे?

तुमच्या मनात एखादा विचार उद्‍भवतो आणि त्या विचारानुसारच सर्व घटना घडतात, तेव्हा ‘ती माझी इच्छाशक्ती आहे. मी इच्छा केली आणि तसेच घडून आले.’ असे तुम्ही म्हणता. तुमच्या मनात असा विपर्यस्त विचार येतो तेव्हा ‘हे तर माझे प्राक्तन आहे.’ असे तुम्ही म्हणता.

विचार न करता तुम्ही इच्छा करू शकता का? इच्छा म्हणजे काय? इच्छाशक्ती म्हणजे काय? तो एक विचार आहे. तुम्ही त्याला इच्छाशक्ती किंवा प्राक्तन म्हणा. प्राक्तन, इच्छाशक्ती आणि त्यांच्या असलेल्या परस्पर संबंधांवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत. ते केवळ विचार आहेत, एवढे साधे सत्य कोणाला समजलेले नाही. ते चैतन्यात तरंगणारे विचार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

Beed News: इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी विरोधात बीडमध्ये एल्गार पँथर सेना आणि आंबेडकर विकास मंच आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Chhatrapati Sambhajinagar: शेतकरी महिला चढली पाण्याच्या टाकीवर; फेर रद्दच्या मागणीसाठी आंदोलन; पैठण तहसील परिसरातील प्रकार

SRH vs RR, Eliminator: हैदराबाद की राजस्थान, आज कोण होणार 'एलिमिनेट'? पाहा संभावित प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT