Sri Sri Ravi Shankar sakal
आरोग्य

चेतना तरंग : विद्यार्थी, साधक आणि भक्त

गुरू पौर्णिमा हा गुरूंचा दिवस समजला जातो, परंतु खरंतर हा भक्तांचा दिवस असतो. गुरुंजवळ येणारे तीन प्रकारचे लोक असतात, विद्यार्थी, साधक आणि भक्त.

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

गुरू पौर्णिमा हा गुरूंचा दिवस समजला जातो, परंतु खरंतर हा भक्तांचा दिवस असतो. गुरुंजवळ येणारे तीन प्रकारचे लोक असतात, विद्यार्थी, साधक आणि भक्त. विद्यार्थी, शिक्षकाजवळ केवळ माहिती प्राप्त करण्याकरिता जातो, माहिती प्राप्त करतो आणि शाळेतून बाहेर पडतो.

हे फक्त पर्यटक मार्गदर्शकाकडे जाण्यासारखे असते. किंवा एखाद्या ट्रॅफिक पोलिसला एखादी माहिती विचारता, ते तुम्हाला माहिती देतात आणि तुम्ही आभार मानून निघून जाता आणि तो भाग तिथेच संपतो. होय किंवा नाही? तुम्ही माध्यमिक शाळेत गेलात, उच्च शाळेत गेलात, बौद्धिक माहिती प्राप्त केली. विद्यार्थी फक्त माहिती प्राप्त करणारा असतो परंतु माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, ते बौद्धिक ज्ञान नव्हे.

त्यानंतर साधक असतो, साधक आपल्या गुरूंच्या मार्गाचे पालन करतो. साधक ज्ञान प्राप्तीसाठी, स्वत:चे जीवन उच्च करण्याकरिता गुरूच्या सानिध्यात असतो. त्याचा एक उद्देश असतो, ध्येय असते, तो केवळ माहिती प्राप्त करत नाही, तर ज्ञानाच्या डोहात चिंब भिजतो.

स्वत:च्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. स्वत:च्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न करतो, तो साधक असतो. प्रत्येक साधकाने स्वत:च्या जीवनातून काही वेळ काढून क्षमतेप्रमाणे विकास करण्याचा प्रयत्न केल्यास एक ना एक दिवस नक्कीच ज्ञान प्राप्त होईल.

नंतर क्रम येतो भक्ताचा, भक्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी नसतो तो फक्त दैवत्वाच्या प्रेमात आकंठ डुंबलेला असतो. तो गुरूंच्या, अमर्याद तत्त्वांच्या, दैवत्वाच्या प्रेमात चिंब भिजलेला असतो. त्याला साक्षात्कार होणार किंवा नाही, ज्ञान मिळवण्याची काळजी नसते. विद्यार्थी बरेच मिळतात, साधक काही मिळतात, परंतु भक्त फारच दुर्मिळ असतात.

देव होण्यात किंवा स्वत:ला देव समजण्यात मोठेपणा नाही. दगडातही देव असतो. तुम्हीही देव आहात, सर्व काही देव आहे, दैवत्व सर्व व्याप्त आहे. परंतु भक्त होण्यात मोठेपणा आहे. तुम्हाला काही पाहिजे असेल किंवा नको असेल ते सर्व दैवत्व आहे. परंतु भक्ती ही दुर्मिळ आणि खूप सुंदर आहे.

साधक गुरू जवळ येतो तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात आणि तो गुरू जवळून परत जातो तेव्हाही त्याच्या डोळ्यात अश्रू असतात. परंतु त्या अश्रूंची कारण वेगळी असतात, ते कृतज्ञतेचे अश्रू असतात, प्रेमाचे द्योतक असतात, प्रेमातही रडण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

भगवान श्रीकृष्ण आपला देह त्याग करीत होते तेव्हा अश्रू भरल्या डोळ्यांनी उद्धवाला म्हणाले, ‘सर्वांच्या भक्तीमुळे हतबल झालो आहे. तू त्यांना सांग की फक्त तेच मला त्यांच्या भक्तीतून आणि प्रेमातून मुक्त करू शकतात. मी ज्या ठिकाणी भक्त माझे गुणगान करतात त्या सर्व ठिकाणी आहे.’

भक्ती ही अशी असते की त्यातून दगडालाही पाझर फुटतो. प्रेमाचा आनंद हा असा असतो की त्यात दैवत्वही चिंब भिजते. या अमर्यादित तत्त्वाची तुम्ही इच्छा करता तोपर्यंत ते तुम्हाला प्राप्त होते. या सृष्टीवर एक भक्त फुलतो तेव्हा दैवत्त्व, सर्व सृष्टी आनंदित होत असते. म्हणून गुरू पौर्णिमा हा भक्तांचा दिवस असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिंगोली भूकंपानं हादरलं, धक्के जाणवताच घराबाहेर आले नागरिक; CCTV VIDEO VIRAL

Sahyadri Tiger Reserve : पाचवेळा चांदोली धरण पोहून जाणाऱ्या 'तारा' वाघिणीला मिळाला जोडीदार; 'सेनापती'सह कॅमेऱ्यात कैद, 'सह्याद्री'त नेमकं काय घडतंय?

Pune Bridge Closed: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! महत्त्वाचा पूल चक्क महिनाभर बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

रिलायन्सला ६४६ कोटी परत द्या, MMRDAला हायकोर्टाचा दणका, प्रकल्पाला विलंब प्रकरणी कारवाई अन्यायकारक

Latest Marathi News Live Update : नालेसफाईतील गोलमाल उघड, गोराई परिसरात धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT