Sri Sri Ravi Shankar
Sri Sri Ravi Shankar sakal
आरोग्य

चेतना तरंग : सौंदर्याचे पूजन

श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

तुम्ही असे पुरुष बघितले असतील, ज्यांच्या पत्नी सुंदर आहेत आणि तरीसुद्धा ते अजून सुंदर मुलींना बाहेर शोधत असतात.

तुम्ही काहीतरी सुंदर पाहता, तेव्हा तुमच्या आत काही तरी होते. ‘आहा...’, असे उद्‍गार निघतात. ज्याप्रमाणे धबधबा डोंगराला चिरून ओसंडून वाहू लागतो त्याप्रमाणेच जणू काही दडपून ठेवलेली जीवनऊर्जा मोकळी होते. एक रोमांच, एक आनंद! मग तुम्हाला त्यावर मालकी हक्क हवा असतो! तुम्ही एका छान मुलीला, किंवा एक छान मुलाला पाहता, जे दिसायला सुंदर आहे, त्याचे सुंदर केस, सुंदर नाक, सुंदर डोळे आणि सगळेच अवयव छान आहेत तेव्हा तुमच्या आत काहीतरी हलते. तुम्ही, ‘आहा...सुंदर!’ असे उद्‍गारता. तुम्हाला फारच छान वाटते. मग पुढची पायरी आहे, तुम्हाला त्या सौंदर्यावर मालकी हक्क पाहिजे असतो.

तुम्हाला ते सौंदर्य आपल्या मालकीचे असावे असे वाटते तेव्हा त्या क्षणी तुम्ही त्याला कुरूप बनविता. तुम्ही असे पुरुष बघितले असतील, ज्यांच्या पत्नी सुंदर आहेत आणि तरीसुद्धा ते अजून सुंदर मुलींना बाहेर शोधत असतात. ज्यांचे सुंदर नवरे आहेत अशा स्त्रियासुद्धा अजून सुंदर पुरुषांना इतरत्र शोधत असतात. कदाचित रूंद खांदे किंवा लांब नाक किंवा चांगले दात किंवा आणि अजून काहीतरी जे त्यांच्या पती किंवा पत्नीमध्ये नसते. याला काही अंत आहे का?

त्यांना तुम्ही जेव्हा तुमच्या मालकीचे करता, तेव्हा त्यांनासुद्धा तुम्ही कुरूप बनविता. त्यामध्ये कोणतीही मोहिनी उरत नाही. मग तुम्ही नव्याच्या मागे जाता, आणि संपूर्ण आयुष्य त्या मृगजळामागे धावण्यात, त्याच्या शोधात जाते. तुम्ही शोध घेतला नाही तर तुम्हाला एखाद्या लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे मृतवत वाटते. सगळे काही गेले आहे. आता पुढे काय? आता धावाधाव नाही. पाठलाग करायला काही नसते तेव्हा आयुष्य अतिशय नीरस बनते. कुठे जाण्यासारखे काही उरत नाही.

तुम्ही सौंदर्य पाहता, तेव्हा त्याचे पूजन करा, त्याला शरण जा. आपण सौंदर्याला शरण गेलो नाही, तर त्याला आपल्या मालकीचे करण्याची इच्छा होते. आपण ज्याला शरण जातो त्यावर मालकी हक्क स्थापित करण्याची आपल्याला गरज वाटत नाही. आपण त्याला आपल्या मालकीचे करू शकत नाही. जे तुमच्यापेक्षा महान आहे, त्याला तुम्ही आपल्या ताब्यात कसे घेऊ शकाल? ईश्वराला सुंदर, सर्वांत सौंदर्यवान असे कल्पिले जाते. तुम्ही सौंदर्याचे पूजन करता, तेव्हा मालकी हक्काची भावना आपोआप नाहीशी होते. सौंदर्य हे तरुण असते. आपल्यापैकी अनेकांना ईश्वर म्हणजे एक म्हातारा माणूस, कोणीतरी पांढरी दाढी असलेला अतिशय प्राचीन व्यक्ती आहे असे वाटते. ईश्वर हा चिरतरुण आहे.

माझ्या मते देव अतिशय खट्याळ आहे आणि त्याला मौज करायला आवडते! ही सगळी मजाच आहे. म्हणूनच देवांनी आपल्या भोवती इतक्या गंमती निर्माण केल्या. यामध्ये सर्व काळज्या आणि त्याबरोबर चालू राहणारी टेपसुद्धा आहे. त्यातसुद्धा मजा आहे. जीवनच मौज आहे.

आपल्याला याची ओळख पटते, तेव्हा जीवन नीरस राहत नाही. मग आध्यात्मिक साधनेचा कंटाळा येत नाही. काहीजणांना आध्यात्मिक साधना म्हणजे काहीतरी अतिशय गंभीर वाटते. तुम्ही गंभीर आणि कठोर चेहऱ्याने बसता. व्यक्तीचा चेहरा जितका अधिक कठोर तितकी आध्यात्मिक प्रगती अधिक. जितकी अधिक सूचक चिन्हे परिधान केलेली तितके अधिक विकसित झालेले. ही तुमची धारणा आहे आणि ही एकदम चुकीची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT