Summer Health Care esakal
आरोग्य

Summer Health Care : उष्णतेपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार घेऊन राहा फिट

Summer Health Care : वाढत्या उष्णतेबरोबरच आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढू लागल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Summer Health Care : वाढत्या उष्णतेबरोबरच आरोग्याच्या अनेक समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. दिनचर्येत बदल, योग्य व समतोल आहाराने हा उन्हाळा विनात्रास घालवणे शक्य आहे. ग्रामीण अथवा खुले परिसर असणाऱ्या ठिकाणांच्या तुलनेत शहरी भागामध्ये उष्णता अधिक जाणवते. यामुळे दिनचर्येत काही साधे मात्र प्रभावी बदल करणे गरजेचे आहे .

उन्हाळ्यात शरीरातील पाणीपातळी सामान्य राखणे गरजेचे असते. ही पातळी कमी झाल्यास अनेक समस्या उद्‌भवतात. शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढून उष्माघात होण्याची शक्यता बळावते. सामान्य तापमानातील पेय पिणे योग्य ठरते. अनेक वेळेला अनावधानाने कोल्ड्रिंक्ससारखे कार्बोनेटेड पेय पिले जातात.

यामध्ये साखर, मीठ या दोन्हीचे प्रमाण जास्त झाल्यास शरीर अधिक अशक्त बनू लागते. लिंबू सरबत, कोकम, कैरीचे पन्हे, ताक, नाचणीचे अंबिल, ताजे घरी बनवलेले फळांचे रस, ताज्या भाज्यांचे ज्यूस यांचे सेवन केल्यास अधिक फायदा होतो. उन्हाळ्यात भूकेचे प्रमाण कमी असते, म्हणून जेव्हा भूक लागेल तेव्हा खाले पाहिजे. यामध्ये फळे, पालेभाज्या यांचा जास्त समावेश असावा.

उन्हाळ्यामधील आदर्श आहार :

सकाळचा नाश्ता : पोहे/उप्पीट/थालीपीठ, थेपला, ओटस्‌चे पदार्थ, इडली, डोसा असे पदार्थ

दुपारचे जेवणर : कोशिंबीर, मोड आलेली कडधान्य एक वाटी, आवश्यकता वाटल्यास भूकेनुसार चपाती, भाजी किंवा डाळ, भात. रोज २ ग्लास ताक किंवा आंबील.

रात्रीचे जेवण : रात्रीचे जेवण हलके असावे. साडेआठच्या आत जेवण करण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये गरम भाकरी, हिरव्या पालेभाज्या, दही यांचा समावेश असावा.

हे करावे

  • एका वेळी जास्त प्रमाणात खाऊ नये

  • खाण्यामध्ये किमान दोन ते तीन तासाचे अंतर

  • आहारामध्ये फळे, भाज्या यांचा समावेश आवश्यक

  • दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिण्यात यावे

  • रोज सात ते नऊ तास झोप घेणे

  • ३० ते ४५ मिनिटे चालणे गरजेचे

हे करू नये

  • जास्त वेळ उपाशी राहणे

  • जास्त चहा, कॉफी घेणे

  • अतितेलकट, तुपकट पदार्थ खाणे

  • साखर, मिठाचे पदार्थ खाणे टाळावे.

अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे आरोग्याचा समतोल बिघडत आहे. व्यायाम, आहार याची योग्य सांगड घातल्यास शरीराचे होणारे नुकसान टाळू शकतो. सुदृढ व्यक्तींसाठी आहार आणि मधुमेह अथवा अन्य व्याधी असणाऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल करणे गरजेचे आहे. काही वेळेला समाजमाध्यमांवरील सल्ले घातक ठरू शकतात.

- डॉ. पल्लवी अडसूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

SCROLL FOR NEXT