Health Care esakal
आरोग्य

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

Health Care : काही लोकांना सतत काही ना काही खाण्याची सवय असते, ते कधी जंक फूड, कधी स्नॅक्स तर कधी फळे खात असतात.

सकाळ वृत्तसेवा

Health Care : काही लोकांना सतत काही ना काही खाण्याची सवय असते, ते कधी जंक फूड, कधी स्नॅक्स तर कधी फळे खात असतात. अशा लोकांचे तोंड कधीच शांत राहात नाही. भरपूर खाऊनदेखील त्यांना भूक लागते.

परंतु, असे सतत खाणे या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. सतत खाऊनसुद्धा जर तुम्हाला भूक लागत असेल, तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार करायला हवेत. सारखी भूक लागत असेल, तर त्यामागे काही कारणे असू शकतात.

मधुमेह

दिवसभर सतत भूक लागण्यामागे मधुमेह हे एक कारण असू शकते. मधुमेह झाल्यानंतर ग्लुकोज संपूर्ण शरीरात पूर्णपणे पसरत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना सारखी भूक लागत असते. तुम्हाला सतत भूक लागत असेल, तर ते मधुमेह होण्याचे संकेत असू शकतात.

जास्त ताण घेणे

काही लोकांना जास्त ताण आल्यानंतरसुद्धा भूक लागते. जास्त तणाव घेतल्याने तब्येत बिघडू शकते. ताणतणावामुळे आपल्या शरीरात बरेच हॉर्मोन्स रिलीज होत असतात, जे भूक वाढवत असतात. अशातच सारखं-सारखं काही ना काही खावंसं वाटतं, त्यामुळे आपण कधी-कधी ओव्हर ईटिंग करत असतो.

जास्त व्यायाम करण्याची सवय

तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजे. परंतु, तो किती प्रमाणात करावा, यालासुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळे जास्त व्यायाम केल्यानेही तब्येत बिघडू शकते. जास्त व्यायाम केल्यानंतर शरीरातील जास्त कॅलरीज खर्च होतात. ज्यामुळे सारखी भूक लागण्याची समस्या वाढू शकते; तसेच जास्त व्यायाम करून मेटाबॉलिझम फास्ट होतात आणि त्यामुळे लवकर भूक लागू शकते.

मैद्याचे पदार्थ खाणे

आजकाल जवळपास सर्व जण मैद्यापासून बनलेले पदार्थ खातात. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट एकदम भरते. परंतु, काही वेळानंतर लगेचच भूक लागते. त्यामुळे भूक वाढण्याचं मैदा खाणं हेसुद्धा कारण असू शकतं.

झोप पूर्ण न होणे

जर तुम्ही वेळेवर झोपत नसाल आणि तुमची झोप पूर्ण होत नसेल, तरी तुम्हाला जास्त भूक लागू शकते. त्यामुळे तुम्ही तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ बदलायला हवी आणि पुरेपूर झोप घ्यायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT