Suhana sakal swasthyam relation of scent and culture Rajiv Seth all good scents Sakal
आरोग्य

Suhana Sakal Swasthyam 2023 : सुगंध आणि संस्कृतीचे घट्ट नाते

माझ्या आजोबांचा परफ्युम्सचे घटक आखाती देश आणि युरोपात निर्यात करण्याचा व्यवसाय होता. त्यांची पुढची पिढीही परफ्युम्स आणि सौंदर्यविषयक वस्तूंच्या व्यवसायात उतरली.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय संस्कृतीत मोगऱ्यापासून चंदनापर्यंतच्या विविध गोष्टींचा दरवळ खूप पूर्वीपासून आहे आणि तो आपल्या परंपरेचा हिस्सा आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन ‘ऑल गुड सेंट्स’ वाटचाल करत आहेत. सुगंधाचे भारताच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी घट्ट नाते आहे. ‘सकाळ स्वास्थ्यम’मध्ये सुगंधाच्या दुनियेचे अंतरंग मी उलगडून दाखवणार आहे.

- राजीव शेठ, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,ऑल गुड सेंट्स

तुम्ही या व्यवसायाकडे कसे वळलात?

माझ्या आजोबांचा परफ्युम्सचे घटक आखाती देश आणि युरोपात निर्यात करण्याचा व्यवसाय होता. त्यांची पुढची पिढीही परफ्युम्स आणि सौंदर्यविषयक वस्तूंच्या व्यवसायात उतरली. आमच्या कुटुंबाची ‘युनिस्टार इंटरनॅशनल कंपनी’ जगभरात नावाजली गेली आहे.

त्यामुळे मलाही अर्थातच कौटुंबिक व्यवसाय म्हणून या क्षेत्रात रस निर्माण झाला. त्यामुळे मी फ्रान्समध्ये फ्रेंच परफ्युमरीविषयी शिकण्याचा निर्णय घेतला. मी फ्रान्समध्ये ‘आयएसआयपीसीए’ नावाच्या एका विशेष महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. या संस्थेत ‘सुगंध’ याच विषयाशी संबंधित घटकांबाबत शिक्षण दिले जाते. भारतीयांना उच्च परफ्युम्स योग्य दरात मिळावेत यासाठी मी ‘ऑल गुड सेंट्स’ हा ब्रँड सुरू केला.

सेंट किंवा ॲरोमा थेरपीचे कोणते परिणाम होतात?

सेंट्स आणि ॲरोमा हे तुमच्या संपूर्ण जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम करू शकतात. ‘परफ्युम ही अशी कला आहे, जी तुमच्या स्मृतींना बोलते करू शकते,’ असे मी सांगतो.

सेंट किंवा परफ्युम तुमचे शरीर आणि मनावर कशा प्रकारे परिणाम करतो?

चांगला सेंट किंवा परफ्युम यांचा वापर केला, तर तुमच्यात आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला तुमच्या स्वतःविषयी अधिक चांगले वाटायला लागते. तुमची उत्फुल्लता वाढते.

परफ्युममुळे तुमचा मूड कशा प्रकारे सुधारू शकतो?

परफ्युम हे अतिशय प्रभावशाली साधन आहे. ते तुमचा मूड उत्तम पद्धतीने सुधारू शकते. वासाबाबत विश्लेषण करणारा मेंदूतला भाग हा तुमच्या भावना आणि तुमच्या स्मृतींबाबत विश्लेषण करणाऱ्या भागाशी एक प्रकारे लिंक झालेला असतो.

त्यामुळे त्या दोन्हींचा एकत्रित परिणाम दिसतो. तुम्ही परफ्युमचा वापर करता, तेव्हा तुम्हाला आनंदी वाटते. तुमचे ताणतणाव कमी होऊन तुम्हाला अधिक रिलॅक्स वाटते. तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत होता आणि त्याच वेळी सजगही बनता.

सेंट्स आणि भारतीय परंपरा यांच्याबाबत तुम्ही काय सांगाल?

सुगंधाचे भारताच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी घट्ट नाते आहे. आपल्या संस्कृतीचे सगळ्यांत एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे परफ्युम्ससाठी वापरले जाणारे नैसर्गिक घटक हे भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य हिस्सा असतात. साधे उदाहरण घ्या. आपल्या भारतीय महिला केसांमध्ये छान जाई, जुई, मोगऱ्याचे गजरे माळतात.

अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये चंदनाचे धूप जाळतात, अगरबत्यांचा वापर केला जातो. आपल्या लग्न समारंभांमध्येदेखील गुलाब आणि मोगरा यांचा वापर केला जातो. या सगळ्याचा दरवळ आपल्या स्मृतींमध्ये कायम राहतो. भारतात तयार होणारी मोगरा आणि आनुषंगिक फुलांचा वापर असलेली तेले, गुलाबपाणी, चंदन यांचा जगभरातील परफ्युम्समध्ये वापर होतो.

‘सकाळ स्वास्थ्यम’मध्ये तुम्ही काय सादर करणार आहात?

‘सकाळ स्वास्थ्यम’मध्ये मी तुमच्या घ्राणेंद्रियांवर प्रभुत्व कसं मिळवायचं आणि ‘सेन्स ऑफ स्मेल’ कसा विकसित करायचा याविषयी विवेचन करणार आहे. मी सेंट्सचे महत्त्व काय हे अधोरेखित करणार आहे. परफ्युम्स तयार करतानाच्या काही पडद्यामागच्या गोष्टीही मी सांगणार आहे आणि इतर गोष्टींविषयी श्रोत्यांना अवगत करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT