Summer Health Care esakal
आरोग्य

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Summer Health Care : उन्हाच्या तीव्र झळांपासून बचाव करणे खूप अवघड असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

सकाळ वृत्तसेवा

Summer Health Care : उन्हाच्या तीव्र झळांपासून बचाव करणे खूप अवघड असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. अनेक लोक बेशुद्ध होतात. जास्त वेळ उन्हात राहणे, पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे आणि बीपी कमी होणे अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे उन्हाळ्यात लोक बेशुद्ध होतात.

कडक उन्हात चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवतात. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता हे जाणून घेऊया.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय करावे?

पाणी प्यावे : उन्हाळ्यात दररोज ७ ते ८ ग्लास पाणी प्या. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हायड्रेट राहावे : शरीराला हायड्रेटेड ठेवावे. तुमच्या आहारात पाणी, नारळपाणी, फळांचा रस यांचा समावेश करावा.

चहा-कॉफी : उन्हाळ्यात उष्माघातापासून दूर राहण्यासाठी चहा-कॉफीचे अतिसेवन टाळावे.

डोळे आणि त्वचेची काळजी : उन्हात बाहेर जाताना डोळ्यांना चष्मा आणि चेहरा स्कार्फने बांधावा.

लिंबूपाणी : उन्हातून घरी आल्यावर लिंबूपाणी किंवा पाणी पोटभर प्यावे. यामुळे शरीर डिहायड्रेट होणार नाही.

रसाळ फळे : उन्हाळ्यात संत्री, टरबूज, खरबूज यासारख्या रसाळ फळांचा समावेश करावा.

ताक : उन्हाळ्यात थंडगार ताक किंवा पन्हे प्यावे. यामुळे शरीराला उष्णतेपासून थंडावा मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spain Crisis : हे झॉम्बी नाहीत तर माणसं... फोटो हादरवणारे! समुद्रातून पोहत लोक स्पेनमध्ये का पोहोचले? मोरोक्कोतून का उडाली झुंबड?

Afroz Jhari Disqualified : महाविकास आघाडीला मोठा धक्का! काँग्रेस नगरसेविका अफरोज झारींचे सदस्यत्व रद्द; महायुतीची पकड मजबूत होणार?

Gorakhpur Murder Case : चिमुकल्या वैभवच्या हत्येप्रकरणी आरोपीचे कुटुंबिय अटकेत, घरावर चालणार बुलडोझर; फॉरेंसिक टीम करणार 'सीन रीक्रिएट'

Maharashtra Flood News: पहिल्याच पावसात कंधार-नरसी मार्ग पाण्यात; बांधकाम विभागाविरोधात ग्रामस्थ करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्याच्या घरी आणि कार्यालयात पेपर बंद, खर्च कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; वृत्तपत्र विक्रेत्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT