Swami Vivekananda and Meditation: Sakal
आरोग्य

काय आहे स्वामी विवेकानंदांची ध्यानपद्धती ? PM मोदी कन्याकुमारीमधील मेडिटेशनमुळे आहे चर्चेत

१३२ वर्षापुर्वी स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस जेथे ध्यान केले होते तेथेच पंतप्रधान मोदी कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ध्यान करण्यासाठी जाणार आहे. स्वामी विवेकानंदांची ध्यानपद्धती कशी होती हे जाणून घेऊया.

पुजा बोनकिले

Swami Vivekananda and Meditation: देशभरात २०२४ च्या निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान मोदी पुन्हा चर्चेत आले आहे. पंतप्रधान मोदी तामिळनाडूतील कन्याकुमारीमधील विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ३१ मे ते १ जून संध्याकाळी ध्यान मंडपमध्ये ध्यान करणार आहे. कारण येथेच १३२ वर्षापुर्वी स्वामी विवेकानंदांनी तीन दिवस ध्यान केले होते. जाणून घेऊया स्वामी विवेकानंदांची ध्यान पद्धती कशी होती.

ध्यान म्हणजे काय?

ध्यान म्हणजे अस्वस्थ मनाला शांत करणे. त्यासाठी एका शांत ठिकाणी बसावे. डोळे बंद करावे आणि श्वासोच्छवास घ्यावा. ध्यान केल्याने आत्मशक्ती, मन:शांती, लक्ष केंद्रित करण्याती क्षमता वाढते. तसेच आरोग्य निरोगी राहते.

ध्यान कसे करावे ?

ज्या आसनात तुम्ही बराच वेळ शांत बसू शकता,त्या आसनात बसावे. पाठीचा कणा शरीराच्या वजनाला आधार देण्यासाठी नाही. त्यामुळे शरीराचा भार मणक्यावर पडू नये अशा आसनात बसावे. सर्व दबापासून मुक्त व्हावे.

स्वामी विकेकानंदांनी कूर्म पुराणातून राजयोगाचा सारांश प्रकाशित केला आहे यामध्ये ध्यान करताना सरळ बसावे आणि भुवयांच्या मध्यभागी असलेल्या दिव्य प्रकाशावर लक्ष केंद्रित करावे. आपले मन त्या दिव्य प्रकाशावर केंद्रित करावे. यामुळे भगवंताशी एकरूपता प्राप्त करू शकता. यामुळे सर्व भय आणि सर्व क्रोध कमी होतो.

ध्यान करण्याची योग्य वेळ

ब्रम्हमुहूर्तावर ध्यान करणे अधिक फायदेशीर असते. या वेळी शरीर आणि मन शांत राहते. ध्यान करण्यासाठी शांत ठिकाणी बसावे. झोपण्यासाठी त्या ठिकाणाचा वापर करू नका. आंघोळ केल्याशिवाय या ठिकाणी प्रवेश करणे टाळावे. यामुळे त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच त्या ठिकाणी चंदन धुप किंवा अगरबत्ती लावावी. मनातल्या मनात म्हणावे- जगातील सर्वजण सुखी होवो, शांती राहावी आणि आनंदी जीवन जगावे असे बोलल्यास सर्वत्र सकारात्मक वातावरण तयार होते.

खडकाचे ऐतिहासिकच आणि पौराणिक महत्व

कन्याकुमारीमध्ये समुद्राच्या मध्यभागी उभ्या असलेल्या एका विशाल खडकावर बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते. कन्याकुमारीमधील समुद्राच्या खोलीतून वर आलेल्या या खडकाला ऐतिहासिकच आणि पौराणिक महत्व आहे. माता पार्वतीनेही या ठिकाणी एका पायावर उभे राहून भगवान शंकराची पुजा केली होती, असे पुराणात सांगितले जाते. हा खडक हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात वसलेला आहे. समुद्राच्या मध्यभागी असलेला हा खडक उसळत्या लाटांमुळे अतिशय सुंदर दिसतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France unrest Explained: फ्रान्स का पेटला? 'Block Everything' म्हणजे काय अन् मॅक्रो राजीनामा देणार का?

Rajgad Crime : रानडुक्कर शिकार प्रकरणी सात जण अटकेत; राजगड तालुक्यातील बोरावळे गावात घडला प्रकार

Nepal Violence: 'जेन-झीं'नी निवडला देशाचा नेता! माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांच्याकडे नेतृत्वाची धुरा

Jalna News : समृद्धी महामार्गावर चोरीच्या उद्देशाने ‘ठोकले खिळे’ सोशल मीडिया व प्रसार माध्यमावर व्हिडीओ व्हायरल मुळे खळबळ

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT