Swasthyam 2022 Sakal Digital
आरोग्य

Swasthyam 2022: कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी कंपन्यांनी काय केलं? पुण्यात चर्चासत्र

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एमसीसीआयए’तर्फे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Swasthyam 2022

पुणे : निरोगी राहण्याची आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याची गरज कोरोनाने अधोरेखित केली आहे. या काळात कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी कंपन्यांनी अनेक नावीन्यपूर्ण बाबीं राबविल्या. पुण्यातील अनेक कंपन्या आणि संस्थांनी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना व उपक्रम केले आहेत. या उपाययोजना व उपक्रम सर्वांना समजावेत म्हणून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणावर आधारित विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

‘सकाळ माध्यम समूह आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चर’(एमसीसीआयए) यांच्या वतीने आयोजित हे चर्चासत्र शुक्रवारी (ता. ९) सकाळी अकरा वाजता ए विंग, पाचवा मजला, एमसीसीआयए ट्रेड टॉवर, सेनापती बापट रस्ता येथे पार पडेल. ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यावेळी मार्गदर्शन करणार आहे. तर ‘टाटा मोटर्स’चे उपमहाव्यवस्थापक डॉ. नितीन जाधव, ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’चे प्रमुख (एचआर) प्रशांत लिखिते, ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’चे मुख्य व्यवस्थापक (ह्यूमन कॅपिटल) मंजिरी जोशी, ‘प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या विमा विभागाचे सहायक महाव्यवस्थापक अर्चना तांबे-पाटील, ‘केपीआयटी टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ एचआर प्रमुख शाश्वत मित्रा, ‘पीडब्ल्यूसी एक्सीलरेशन सेंटर’च्या टॅलेंट कन्सल्टंट व्यवस्थापक दिपोश्री दत्ता यात सहभागी होणार आहेत.

कोरोनाची साथ आणि त्यानंतरही भारतीय कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचे कुटुंब कल्याण करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. हे चर्चासत्र ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘स्वास्थ्यम्’ या अभिनव उपक्रमाचा एक भाग आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नऊ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यातील विविध ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला आहे.

नोंदणी आवश्‍यक

या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

मात्र नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे.

संपर्क - अमृता आर्टे- ९१४६००२२१६

ईमेल : 1.anagha@gmail.com

कुठे आणि कधी?

तारीख ः ९ डिसेंबर (शुक्रवार)

वेळ ः सकाळी ११ वाजता

ठिकाण ः ए विंग, पाचवा मजला, एमसीसीआयए ट्रेड टॉवर, सेनापती बापट रस्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : अमरावतीत काँग्रेस-भाजपात काट्याची टक्कर; ५० जागांचे निकाल जाहीर, कुणाला किती जागा?

Pune Municipal Results : पुण्यात मोठा राजकीय धक्का! प्रभाग 39 मध्ये गुंड बापू नायरचा पराभव, भाजपचा धडाकेबाज विजय

Nashik Election Result: नाशिकमध्ये माजी महापौर विरुद्ध माजी उपमहापौर रंगलेली लढत; अखेर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ?

Pune Election Result 2026: मूळ पुणेकर कुणासोबत? सदाशिव पेठेसह इतर पेठांमध्ये 'हे' उमेदवार विजयी

Municipal Election Results : सोलापुरात मनसे नेत्याची हत्या झालेल्या प्रभागात भाजप उमेदवाराने तुरुंगातून जिंकली निवडणूक, मनसेची उद्विग्न प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT