Swasthyam 2023 reduce mobile use How to measure age of  tree Cypress tree Great Grandfather
Swasthyam 2023 reduce mobile use How to measure age of tree Cypress tree Great Grandfather sakal
आरोग्य

Swasthyam 2023 : झाडा तुझं वय किती?

सकाळ वृत्तसेवा

झाडाला कुठं वय असतं का? माणूस, प्राणी, एखादी वास्तू यांचं वय मोजता येतं. मात्र, झाडाचं वय कसं मोजणार? तुम्हालाही प्रश्न पडला ना?

- वैशाली मंडपे

झाडाला कुठं वय असतं का? माणूस, प्राणी, एखादी वास्तू यांचं वय मोजता येतं. मात्र, झाडाचं वय कसं मोजणार? तुम्हालाही प्रश्न पडला ना? होय झाडांचंही वय मोजता येतं. आणि त्यासाठी वापरली जाणाऱ्या शास्त्रशुद्ध पद्धतीची आज आपण माहिती घेऊयात.

जगातील सगळ्यात प्राचीन वृक्ष कोणता? दक्षिण चिलीमधील अलर्स कोस्टेरो नॅशनल पार्कमधील ‘सायप्रस ट्री’ सर्वांत जुना वृक्ष असल्याचं नवीन संशोधनात आढळलं आहे. या झाडाचं वय ५ हजार ४८४ वर्षं, म्हणजे पृथ्वीवरील सर्व झाडांपेक्षा जास्त आहे.

म्हणूनच त्याला ‘ग्रेट ग्रँडफादर’ असंही म्हणतात. या आधी कॅलिफोर्नियाच्या व्हाइट माउंटनमध्ये स्थित ब्रिस्टलकोन पाइन हे सर्वांत जुने झाड असल्याचं म्हटलं जात होतं. त्याचं नाव मेथुसेलाह. त्याचं वय ४ हजार ८५३ वर्षं आहे.

झाडाचं वय कसं मोजतात?

झाडाच्या प्रकारानुसार वेगवेगळी पद्धत वय मोजण्यासाठी वापरली जाते. उदाहरणार्थ, मोठ्या वृक्षाचं वय मोजताना खोडाचा घेर मोजून किंवा शाखांच्या ओळी मोजू शकता. अचूक पद्धत म्हणजे खोडातील रिंग मोजणे, परंतु हे केवळ झाड कापल्याशिवाय शक्य नाही किंवा वृक्ष हा मृत असावा लागतो.

झाडाचं वय त्याचा आतील बुंधा कापून त्यामध्ये जेवढे वक्राकार वर्तुळ आतून बाहेर बाजूस जाताना दिसतील, त्यावरून ठरते. झाडाच्या खोडावर दोन रंगांच्या रिंग असतात. गडद रिंग ​​ज्या उन्हाळ्यात तयार होतात आणि थोड्या फिकट रंगाच्या ज्या वसंत ऋतुमध्ये बनतात.

ही पद्धत झाड मृत असेल किंवा नैसर्गिक आपत्तीत मोडले असेल, तरच खोडाचा छेद घेऊन त्यावर असणारी वलये मोजून झाडाचे वय ठरवणे योग्य. त्यानुसार, त्या वृक्षाच्या खोडाचा आडवा छेद पातळ कापावा लागतो.

यावरून वृक्षावरील डार्क आणि लाइट वाढचक्रं मोजली जातात. दुसऱ्या आधुनिक पद्धतीमध्ये खोडाच्या मध्यभागातील पेशींचा समूह बाहेर काढावा लागतो. त्यानंतर रेडिओ अ‍ॅक्सिव्ह कार्बनच्या साहाय्यानं त्याचं आयुर्मान निश्चित केलं जाऊ शकतं.

निरोगी झाडाचं वय निश्चित करण्यासाठी झाड तोडू नये. त्याऐवजी, दुसरी पद्धत वापरता येते. तुमच्या गावातील वखारीला भेट दिल्यास तिथं कापलेल्या ओंडक्यांवर मुलांना ही वलय दाखवता येतील. आणि झाडांचं वय ही मोजायला येईल.आहे की नाही रंजक माहिती?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT