Health Care  esakal
आरोग्य

Health Care : हे संंकेत सांगतात, तुम्ही खाताय गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मीठ; वेळीच बदला ही सवय

चला तर आज आपण शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यावर कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया

साक्षी राऊत

Health Care : मिठाशिवाय तुम्ही कुठल्याच पदार्थाची कल्पना करू शकत नाही. मिठाने जेवणाची चव वाढते. मात्र मिठाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त जेवणात असेल तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास तुम्हाला शरीरात अनेक बदल दिसून येतील. चला तर आज आपण शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यावर कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊया.

ब्लोटिंग - मिठाचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते. जेवल्यानंतर तुम्हाला नेमहीपेक्षा जास्त फुगल्यासारखे वाटणे हे त्याचेच लक्षण आहे. शरीरात सोडियमची मात्रा काही प्रमाणात असतेच.

अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात जास्त सोडियम मिसळता, तेव्हा किडनीला जास्त पाणी साठवून ठेवावे लागते. जेव्हा शरीरात मिठाचे प्रमाण जास्त असते तेव्हा पाणी जास्त प्रमाणात जमा होते. या स्थितीला वॉटर रिटेंशन किंवा फ्लूइड रिटेंशन असं म्हणतात

घशाला कोरड पडणे

जेव्हा तुम्ही जास्त मिठाचे सेवन करता तेव्हा तुमचा गळा लवकर सुखतो. आणि तुम्हाला वारंवार तहान लागते.

हाय ब्लड प्रेशर

शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते. रक्तदाबातील हा बदल किडनीद्वारे होतो. जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांना द्रव उत्सर्जित करणे कठीण होते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.

झोपेत अडथळे

जर तुम्ही झोपण्यापूर्वी जास्त सोडियमयुक्त पदार्थांचे सेवन केले तर तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. रात्री झोपण्यापूर्वी मिठाचे प्रमाण जास्त असलेले अन्न खाल्ल्याने झोप न लागणे, अस्वस्थ वाटणे आणि रात्री वारंवार जाग येणे यांसारख्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. (Health)

ह्रदयाचे आजार

मिठाचे जास्त सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण संतुलित ठेवावे.

मळमळ वाटणे

आहारात जास्त मीठ घेतल्याने तुमच्या पोटाचं संतुलन बिघडू शकते ज्यामुळे तुम्हाला मळमळल्यासारखे वाटू शकते. अशा स्थितीत जेवणातील मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. तसेच, तुमचे शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT