tailbone sakal
आरोग्य

टेल बोनचे दुखणे

आपल्या पाठीच्या तळाशी एक लहान त्रिकोणी हाड असते त्याला कोक्सीस असे म्हणले जाते. त्यात ३ ते ५ मणके एकत्रित होऊन हे त्रिकोणी हाड तयार होते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. अजय कोठारी | डॉ. सिंपल कोठारी

आपल्या पाठीच्या तळाशी एक लहान त्रिकोणी हाड असते त्याला कोक्सीस असे म्हणले जाते. त्यात ३ ते ५ मणके एकत्रित होऊन हे त्रिकोणी हाड तयार होते. लहान आकार असूनही महत्त्वपूर्ण कार्य करते बरेच स्नायू, पेशी यास जोडल्या जातात. बसलेल्या अवस्थेत वजन पेलण्याचे कार्य करते.

टेल बोनचे दुखणे म्हणजे कोक्सिडायनिया जास्त करून लठ्ठ व्यक्तींमध्ये आढळून येतात. यातील ९० टक्के लोक आपोआप बरे होतात; तर काहींना बरेच उपचार करावे लागतात त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ.

लक्षणे

१. तीक्ष्ण व सतत शेपटीच्या हाडात दुखणे

२. बसून उभे राहताना दुखणे.

३. मलविसर्जन होताना दुखणे

टेल बोनला खालील कारणांमुळे दुखापत होऊ शकते.

१) जोरात खालच्या भागात पडल्याने शेपटीचे हाड घासणे, किंवा तुटणे किंवा निखळणे होऊ शकते.

२) सारख्या हालचाली मुळे उदा. सायकलींग, रोइंग या सारख्या हालचालीत मागे पुढे झुकावे लागते त्यामुळे हाडाभोवतीच्या ताण येऊ शकतो.

३) गर्भधारणा व बाळंतपण गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीत तुमचे शरीर हार्मोन्स स्रवित करते. ते तुमच्या हाडामधला भाग मऊ करते व लवचिकता देते. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु कधीकधी स्नायू जास्त ओढल्याने वेदना निर्माण होतात.

४) अतिरिक्त वजन तुमच्या शेपटीच्या हाडांवर दबाव टाकते यामुळे तुमचा टेलबोन मागे झुकू शकतो. परिणामी बसण्याच्या वेदना होतात.

५) अतिशय कमी चरबी यामुळे हाडे एकमेकाला घासून सूज निर्माण होऊन वेदना होऊ शकतात.

६) बराच वेळ बैठ काम करणाऱ्या व्यक्ती खास करून तुम्ही कडक पृष्ठभागावर बसल्यास.

७) हे दुखणे कर्करोगाचे लक्षण असू शकते. (प्रोस्टेटचा कर्करोग, आतड्यांचा, हाडांचा)

निदान व चाचण्या

तुम्हाला संपूर्ण आरोग्य विषयक माहिती विचारली जाईल. तुमच्या खाली पडण्याबद्दल किंवा कठीण बाळंतपणाबद्दल विचारपूस केली जाईल नंतर फ्रॅक्चर वाटत असल्यास क्ष-किरणे व सीटी स्कॅन केले जाईल. डॉक्टरांना तेथे सुज, गाठ, याबद्दल तपास घेण्यासाठी एमआरआय व बोन स्कॅन (PET) सांगितले जाईल. याबाबतची उपचारपद्धतीबाबत पुढील भागात माहिती घेऊयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT