Teetch Cleaning esakal
आरोग्य

Teeth Cleaning : महागड्या ट्रिटमेंट्स कशाला? हे घरघुती उपाय करत मिळवा मोत्यासारखे पांढरेशुभ्र दात

पांढरे शुभ्र दात हेवत असे वाटणाऱ्यांसाठी हे उपाय अगदीच बेस्ट आहेत

सकाळ ऑनलाईन टीम

Teetch Cleaning : हल्ली धावपळीच्या जीवनशैलीमुळे सकाळी अनेकजण घाईघाईत ब्रश करतात. त्यामुळे बऱ्याच लोकांचे दात तुम्हाला पिवळे दिसतात. अनेकदा या दातांना आपल्याला मोकळेपणाने हसायचीसुद्धा लाज वाटते. तेव्हा पांढरे शुभ्र दात हवेत असे वाटणाऱ्यांसाठी हे उपाय अगदीच बेस्ट आहेत. चला तर आज आपण पांढऱ्या दातांसाठी 4 घरघुती उपाय जाणून घेऊया.

आलं

आल्याचे छोटे छोटे काप करून मिक्सर मधून बारीक करा. त्यात 1/4 चमचे मीठ घाला. त्यात लिंबाचा रसही मिसळा. या तिन्ही गोष्टींचं मिश्रण टूथब्रशने घासावं. यामुळे दात पांढरे दिसण्यास मदत होईल.

कोको पावडर

कोको पावडर पाण्यात किंवा खोबरेल तेल मिसळून पेस्ट बनवा. नंतर ब्रशवर लावून दात स्वच्छ करा. या मिश्रणाच्या वापराने दातांची चमक पुन्हा येईल.

पुदिन्याची पानं

पुदिना फार फायदेशीर असून त्याचा उपयोग औषध म्हणूनही केला जातो. यासाठी कडुलिंबाची पानं एका भांड्यात ठेवून गरम पाण्यात उकळवा. नंतर पाणी काढून थंड होण्याची वाट पाहा. आता या पाण्याने गुळल्या करा. कडुलिंबाच्या कडूपणामुळे तोंड आणि दातांमध्ये असलेले जंतू नष्ट होतात. (Adverse Effect on teeth)

तसेच तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी तुम्ही हे काही उपाय टाळले पाहिजे

जोरात दात घासणं

तोंडांचं आरोग्य जपण्यासाठी ब्रश करणं आवश्यक आहे. मात्र जोराजोरात ब्रश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. मात्र यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. (Health)

खाल्ल्यानंतर दात घासणं

जेवल्यानंतर लगेजच दात स्वच्छ करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे तुम्हांला वाटत असेल परंतू जेवणानंतर लगेच ब्रश केल्याने दातांवरील अ‍ॅसिड निघून जाते परिणामी इनॅमल खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच जेवणानंतर 30-40 मिनिटांनी ब्रश करावा.

चॉकलेट

अतिगोड खाण्याची सवयही दातांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. गोड खाण्यामुळे दातांवर अ‍ॅसिड जमा होते. अशाप्रकारे अ‍ॅसिड अधिक काळ टिकून राहिल्यास हिरड्या आणि दातांचे नुकसान होते.

(डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून सकाळ समुह पुष्टी करत नाही.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : पुढच्या वेळी आदित्य ठाकरेंना दावोसला नेतो - फडणवीस

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT