Winter Health Care  esakal
आरोग्य

Winter Health Care : थंडीनं तापमानाचा पारा घसरला; हार्ट अटॅकचाही धोका वाढला, अशी घ्या काळजी

थंडीमध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायची ते आपण जाणून घेऊयात

सकाळ ऑनलाईन टीम

Winter Health Care : गेल्या दोन दिवसांत थंडीचा कडाका वाढलाय. त्यामुळे सर्वत्रच थंडीची हुरहुरी वाढलेली दिसते. अशातच हार्ट अटॅकचा धोका देखील वाढलाय. त्यामुळे कुठेही हार्ट अटॅक येण्याच्या समस्या गंभीररित्या वाढल्यात. 2 दिवसांपूर्वी फरीबादमधला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यात एका मेडिकल स्टोअरमध्ये औषध घ्यायला गेलेल्या एका तरुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. तेव्हा थंडीमध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायची ते आपण जाणून घेऊयात.

थंडीत हार्ट अटॅकचा धोका कसा वाढतो?

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका अधिक असतो. पहाटे थंडी जास्त असल्यास रक्तवाहिन्या (Blood Vessels) आकुंचन पावतात आणि त्यामुळे अटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ होते. अति थंडीत रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकची शक्यता होऊ शकते. तसंच हिवाळ्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात. ब्लॉक असलेल्या रुग्णांनी थंडीत काळजी घ्यायला हवी.

थंडीत असे जपा आरोग्य

थंडीच्या दिवसांत हृदयाला रक्तपुरवठा कमी होणे, रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होणे, शरीरातील अतिरिक्त चरबी, कोलेस्टेरॉलची वाढ यांच प्रमाण वाढतं. पण जीवनशैलीतील काही गोष्टींवर नियंत्रण आणल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

1) अतिप्रमाणात अल्कहोल घेणे किंवा धूम्रपान करणे टाळा.

2) शारीरिक आणि मानसिक ताण कमी करा, सतत ताण घेतल्याने हृदयाच्या धमन्यांना सूज येते त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात परिणामी हार्ट अटॅकची शक्यता वाढते. ताण कमी करण्यासाठी वाचन, गाणी, फिरणं अशा मन रमवा

3) अपूर्ण झोपही हार्ट अटॅकचं कारण ठरू शकतं, त्यामुळे रात्रीच्या वेळी 7 ते 8 तासांची झोपं आवश्यक आहे. व्यवस्थित झोपेमुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.

4) रोजच्या आहाराकडे लक्ष द्या. आहारात मीठ, साखर आवश्यक त्या प्रमाणातच वापरा. आहारात जास्त मीट वापरल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, तर साखरेमुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. या दोन्ही गोष्टी हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू शकतात. (Winter)

5) आपल्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज किमान 30 मिनटं व्यायाम करा, पण थंडीच्या दिवसात पहाटे किंवा रात्रीच्या गारठ्यात व्यायाम करणं शक्यतो टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT