Health Care  esakal
आरोग्य

Health Care : हिवाळ्यात ‘या’ फळभाज्यांचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी आहे लाभदायी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

हिवाळ्यात विविध प्रकारची फळे आणि भाज्या बाजारात येतात.

Monika Lonkar –Kumbhar

Health Care : थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये विविध प्रकारचे फळे आणि भाज्या बाजारात येतात. या भाज्यांचा आणि फळांचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे.

या फळभाज्यांमध्ये गाजर, बीट आणि आवळ्याचा समावेश असतो. या तिन्ही घटकांमध्ये पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते. या सर्व गोष्टी आपण सॅलेड, सूप्स आणि ज्यूसच्या रूपात आहारात समाविष्ट करतो.

परंतु, अनेकांना या गाजर, बीट आणि आवळ्याचा वापर करून बनवण्यात आलेले सॅलेड्स खायला आवडत नाही. अशा लोकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजे या सर्व घटकांचा एकत्रितपणे ज्यूस बनवून तो पिणे. यामध्ये मग, तुम्ही तुमच्या आवडत्या फळांचा ही समावेश करू शकता.

या सगळ्यांचा मिळून बनवलेला ज्यूस आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. कारण, यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. त्यामुळे, आपल्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात, याचे फायदे खालीलप्रमाणे

बॉडी डिटॉक्ससाठी उपयुक्त

गाजर, बीट आणि आवळ्याचा ज्यूस हा आपले शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो. त्यामुळे, हा ज्यूस पिणे आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. थंडीमुळे हिवाळ्यात पाणी कमी प्यायले जाते. त्यामुळे, डिहायड्रेशनचा त्रास होऊ लागतो.

त्यामुळे, अशा स्थितीमध्ये हा ज्यूस प्यायल्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. शिवाय, शरीरातील विषारी घटक देखील बाहेर पडण्यास मदत होते.

पचनासाठी फायदेशीर

आवळा, गाजर आणि बीट यांपासून बनवलेला ज्यूस प्यायल्याने आपली पचनक्षमता सुधारते. शिवाय, हा ज्यूस प्यायल्याने पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे, पचनकार्य सुरळीत होते. ज्यांना पोटाच्या समस्या आहेत, अशा लोकांनी आहारात या ज्यूसचा अवश्य समावेश करावा.

त्वचेसाठी उत्तम

आवळा, बीट आणि गाजर या तिन्ही फळभाज्यांमध्ये व्हिटॅमीन सी, ए, के, बी आणि ई इत्यादी प्रकारचे व्हिटॅमिन्स आढळून येतात. व्हिटॅमिन्ससोबतच कॅल्शिअम आणि मिनरल्सचे ही भरपूर प्रमाण या तिघांमध्ये आढळून येते.

हे तिन्ही घटक आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहेत. त्यामुळे, या तिन्ही घटकांपासून बनवलेला ज्यूस प्यायल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. शिवाय, त्वचा घट्ट आणि तरूण राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT