Green Apple Benefits
Green Apple Benefits esakal
आरोग्य

Green Apple Benefits : हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे हिरवे सफरचंद, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Monika Lonkar –Kumbhar

Green Apple Benefits : रोज नियमितपणे सफरचंद खाल्ल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेक पौष्टिक गुणधर्मांचा समावेश सफरचंदामध्ये आढळून येतो. अनेक जण लाल रंगाचे सफरचंद खातात आणि बहुतेक सर्वांना या लाल सफरचंदाबद्दल माहित आहे. मात्र, तुम्हाला हिरव्या सफरचंदाबद्दल काही माहित आहे का?

लाल सफरचंदाप्रमाणेच हिरव्या सफरचंदाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. हिरव्या रंगाच्या सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, लोह, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. त्यामुळे, हिरवे सफरचंद खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. कोणते आहेत हे फायदे? चला तर मग जाणून घेऊयात.

हाडांना मिळते बळकटी

हिरव्या सफरचंदामध्ये कॅल्शिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. हाडांच्या आरोग्यासाठी आणि मजबूतीसाठी कॅल्शिअम फायदेशीर आहे. त्यामुळे, या सफरचंदाचे नियमित सेवन करणे, फायद्याचे ठरते.

महिलांच्या शरीरात एका ठराविक वयानंतर अशक्तपणा येतो, किंवा हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा स्थितीमध्ये महिलांनी त्यांच्या आहारात हिरव्या सफरचंदाचा जरूर समावेश करावा.

हृदयासाठी फायदेशीर

काही संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, जे लोक नियमितपणे हिरव्या सफरचंदाचे सेवन करतात, त्या लोकांमध्ये हृदयविकाराची लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे, या सफरचंदाचे सेवन करणे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

या शिवाय, हिरव्या सफरचंदाच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश असतो. ज्यामुळे, आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

हिरव्या सफरचंदामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स आणि पाणी आढळून येते. त्यामुळे, जेव्हा आपण या सफरचंदाचे सेवन करतो तेव्हा आपले पोट जास्त काळ भरलेले राहते. आपल्याला फार भूक लागत नाही. त्यामुळे, वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

यासोबतच हिरव्या सफरचंदामध्ये फॅट्स बर्निंग करणारे घटक आढळून येतात. हे घटक आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यास मदत करतात.

पचनक्षमता सुधारते

हिरव्या सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने आपली पचनक्षमता सुधारते. कारण, या सफरचंदामध्ये असलेले फायबर्स पचनासाठी मदत करतात. यासोबतच हिरवे सफरचंद खाल्ल्याने आपल्या शरीरातील मेटॅबॉलिजम सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Rohit Sharma : क्रिकेटपटूंची गोपनीयता जपा! ; मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा आयपीएल ब्रॉडकास्टरवर भडकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

Kalyan News: देशाच्या विकासासाठी मतदार महायुतीच्याच बाजूने, विश्वनाथ भोईरांचे वक्तव्य

Akshay Kumar : अक्षयचा दिलदारपणा; जॉली एलएलबीचं शूटिंग पूर्ण होताच केली 500 मुलींना मदत

SCROLL FOR NEXT