Ishan Kishan was hit on his left toe by a Jasprit Bumrah yorker during practice
esakal
India vs Namibia T20 World Cup 2026 : भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेला पराभूत करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची दमदार सुरुवात केली. त्या लढतीत जसप्रीत बुमराह आजारी पडल्याने खेळला नव्हता, परंतु तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. पण, सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. तिलक वर्माने दिलेल्या अपडेट्सनुसार अभिषेकला डिस्चार्ज मिळाला आहे, परंतु त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच. अशात भारताला सराव सत्रात आणखी एक धक्का बसला. जसप्रीतच्या वेगवान यॉर्कवर स्टार फलंदाजाच्या टाचेला दुखापत झाली आणि तो वेदनेने विव्हळताना दिसला. हा भारताला खूप मोठा धक्का मानला जात आहे आणि आता त्या खेळाडूबाबतचे अपडेट्सही हाती आले आहेत.