Benefits of Broccoli esakal
आरोग्य

Benefits of Broccoli : हिवाळ्यातील सुपरफूड आहे ब्रोकोली, जाणून घ्या ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Health benefits: ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Broccoli : पोषकतत्वांनी समृद्ध असलेली आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ब्रोकोली अनेकांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. हिवाळ्यातील सुपरफूड म्हणून ब्रोकोलीचे वर्णन केले जाते.

ब्रोकोली ही एक चविष्ट भाजी आहे. हिवाळ्यात या भाजीचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे लाभदायी ठरते. ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो.

ब्रोकोलीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसेच, पचनक्रियेचे कार्य सुलभरित्या पार पडते. आज आपण ब्रोकोलीचे आरोग्यदायी फायदे कोणते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मधुमेह नियंत्रित ठेवते

ब्रोकोलीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेह असलेल्या रूग्णांनी त्यांच्या आहारात हिरव्या भाज्यांसोबत ब्रोकोलीचा ही समावेश करावा. शिवाय, ब्रोकोलीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे, आहारात ब्रोकोलीचा जरूर समावेश करावा.

हृदयासाठी फायदेशीर

ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमध्ये फायबर्स, जीवनसत्वे आणि खनिजे यांचा समावेश आहे. हे सर्व घटक हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

ब्रोकोलीमधील फायबरची गुणवत्ता रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य ठेवण्याचे काम करतात. ज्यामुळे, हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

व्हिटॅमिन सी चा समृद्ध स्त्रोत म्हणून ब्रोकोलीला ओळखले जाते. व्हिटॅमिन सी मध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म आपल्या शरीराला विविध प्रकारचे संसर्ग आणि रोगांशी लढण्यास मदत करतात.

तसेच, शरीरातील पांढऱ्या पेशींच्या निर्मितीस प्रोत्साहन देण्याचे काम व्हिटॅमीन सी करते. त्यामुळे, थंडीत ब्रोकोलीचे सेवन केल्याने सर्दी, खोकला आणि फ्लू सारख्या संसर्गाचा धोका कमी होतो, म्हणून थंडीत ब्रोकोलीचे सेवन करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

त्वचेसाठी लाभदायी

ब्रोकोलीमध्ये आढळून येणारे व्हिटॅमीन सी हे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. त्यासोबतच, हे व्हिटॅमीन सी आपल्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवण्यावर भर देते. त्यामुळे, ब्रोकोलीचे सेवन करणे हे त्वचेसाठी लाभदायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT